मुंबई : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. संपूर्ण देश या घटनेने शोकाकूल वातावरणात आहे. अटलजींच्या अनेक आठवणींना यावेळी उजाळा मिळत आहे. अशावेळी अटलजींनी लिहिलेल एक पत्र समोर आलंय. या पत्रातून त्यांचा हजरजबाबीपणाचा गुण दिसून येतोयं.
श्याम सुंदर लद्रेछा यांच्यानावे १९ मार्च १९९१ ला अटल बिहारी वाजपेयी यांनी हे पत्र लिहिले होते. वाजपेयींना लग्नाचे आमंत्रण आले होते. लद्रेच्छा हे राजस्थान उच्च न्यायालयात अतिरिक्त महाधिवक्ता आहेत. या आमंत्रणाचे उत्तर वाजपेयीजींनी या पत्रातून दिले.
'तुम्ही चतुर्भुज होत आहात. खूप खूप शुभेच्छा. इच्छा असूनही मला तिथं येणं शक्य नाही. इथे पण एका लग्नाची वरात सजतेय. यामध्ये आडवाणी नवरदेव आहेत. नवी दिल्लीचे सरकार लग्न करून आणायचंय.' असे या पत्रात लिहंलयं. अटलजी लग्नाला न आल्याच लद्रेच्छा यांना वाईट वाटलं नाही पण अटलजींच्या हजरजबाबी गुणाची आठवण त्यांनी कायम लक्षात ठेवली. आज जेव्हा अटलजी या जगात नाहीत तेव्हा इतरांप्रमाणे लद्रेच्छा यांनाही वैयक्तिक नुकसान झाल्याची जाणिव झाली.