ओडिशा विधानसभा निवडणुकीत बीजेडीची सरशी

बीजेडी ९४ जागांवर आघाडीवर असून बीजेपी २८ जागांवर पुढे आहे.

Updated: May 23, 2019, 12:59 PM IST
ओडिशा विधानसभा निवडणुकीत बीजेडीची सरशी title=

ओडिशा : लोकसभा निवडणूक २०१९ निवडणूकांच्या दरम्यान ओडिशामध्ये विधानसभेच्या १४७ जागांसाठी मतदान घेण्यात आले होते. या निवडणूकांचा निकाल आज लोकसभा निवडणूकांच्या निकालादिवशी घेण्यात येत आहे. ओडिशामध्ये नवीन पटनायक यांचा पक्ष बीजू जनता दल (बीजेडी) आघाडीवर आहे. 

नवीन पटनायक लोकप्रिय नेते आहेत. २००० पासून ओडिशाचे मुख्यमंत्री असलेले नवीन पटनायक या ही विधानसभा निवडणूकांमध्ये जनतेचा विश्वास राखून ठेवण्यास यशस्वी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ओडिशामध्ये बीजेडी सरकार येणाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ओडिशामध्ये १४६ जागांपैकी १२८ जागांच्या हाती आलेल्या कलनुसार, बीजेडी ९४ जागांवर आघाडीवर असून बीजेपी २८ जागांवर पुढे आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणूकांमध्ये बीजेडी ११७, काँग्रेसला १६ जागांवर विजय मिळवला होता. २०१४ मध्ये बीजेडीसाठी ४३.४ टक्के मतदान झाले होते. भाजपाला १८ टक्के तर काँग्रेससाठी २५.७ टक्के मतदान झाले होते.