गुवाहटी : आसामच्या बारपेटा जिल्ह्यातील फखरुद्दीन अली अहमद हॉस्पिटलमध्ये बुधवारी संध्याकाळपर्यंत ७ नवजात बालकांचा मृत्यू झाला. इथे बालकांच्या मृत्यूंचे प्रमाण जास्त असल्याने ही घटना म्हणजे राज्यासाठी धोक्याची घंटा असल्याचे म्हटले जात आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी दुपारी ७.२० ते ११ या वेळेत हॉस्पिटलमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला तर गुरुवारी दोन बालकांचा मृत्यू झाला. ही सर्व मुले दोन किंवा चार वर्षांची होती. चार इतर शिशुची स्थिती गंभीर आहे. जन्मावेळी नवजात शिशूंचे वजन कमी तसेच कमी अवधीत जन्म झाल्याने मृत्यू झाल्याचे राज्य आरोग्य मंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले. फखरुद्दीन अली अहमद महाविद्यालयाचे प्राचार्य आणि मुख्य अधीक्षक दिलीप कुमार दत्त यांनी गुरुवारी वैद्यकीय निष्काळजीची बातमी फेटाळून लावली. जन्माच्या वेळी नवजात बाळांना श्वासोच्छवासाचा त्रास झाल्याचे त्यांनी सांगितले.
दत्त म्हणाले की " जन्मावेळी मुलांचे वजन १ किलोग्रॅम, २ किग्रॅ, २.२ किग्रॅ इतके कमी होते. त्यांच्या आईला इस्पितळात भरती न केल्याने परिस्थिती आणखी वाईट झाली आणि दुर्दैवाने आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही ". राज्य आरोग्य मंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की ही नवजात मुलांना योग्य उपचार देण्यात आले. परंतु नाजूक परिस्थिती असल्यामुळे ते मरण पावले. ते म्हणाले, "दोन मातांचे वय २० वर्षे होते. या मेडिकल कॉलेजात गेल्या वर्षीच्या तुलनेत बालमृत्यूचा दर कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.