SBI खातेधारकांसाठी Tension वाढवणारी बातमी; 'या' सेवेसाठी मोजावे लागणार जादा पैसे

SBI Hike: भारतीय रिझर्व्ह बँकेकडून काही महत्त्वाच्या धोरणांमध्ये बदल केल्यानंतर त्याचे पडसाद थेट सर्वसामान्यांच्या आयुष्यावर उमटताना दिसतात. 

Updated: Dec 15, 2022, 08:54 AM IST
SBI खातेधारकांसाठी Tension वाढवणारी बातमी; 'या' सेवेसाठी मोजावे लागणार जादा पैसे  title=
as rbi changed repo rate SBI decides to hike Interest Rates

SBI Interest Rate Hike: भारतीय रिझर्व्ह बँकेकडून काही महत्त्वाच्या धोरणांमध्ये बदल केल्यानंतर त्याचे पडसाद थेट सर्वसामान्यांच्या आयुष्यावर उमटताना दिसतात. यामध्ये आता एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेधारकांचाही समावेश झाला आहे. प्राथमिक स्तरावर मिळालेल्या माहितीनुसार स्टेट बँककडून सध्या एका सेवेसाठी जादा पैसे आकारले जाणार आहे.  

खातेधारकांची चिंता वाढण्याचं कारण काय? 

समोर आलेल्या वृत्तानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाची सर्व कर्ज महागली आहेत. तसंच ज्यांनी बँकेकडून कर्ज घेतली त्यांच्याही होम लोनचा हप्ता वाढला आहे. स्टेट बँकेने MCLR मध्ये 25 बेसिस पॉईंट्सची वाढ केल्यामुळे कर्ज महागण्यासोबतच चालू कर्जाचा हप्ताही वाढल्याचं स्पष्ट झालं आहे. एमसीएलआरमध्ये पाव टक्का वाढीची बातमी एसबीआयने आज सकाळी आपल्या वेबसाईटवर जारी केली. आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केल्यावर एसबीआयने हा निर्णय घेतला.  

किती टक्क्यांनी वाढला रेपो रेट? 
डिसेंबर महिन्यातच पार पडलेल्या एमपीसी बैठकीमध्ये आरबीआयकडून रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली. 35 बेसिस पॉईंट्सनं ही वाढ झाली ज्यामुळं रेपो रेट 6.25 वर पोहोचला. मे महिन्यापासून आतापर्यंत आरबीआयनं रेपो रेटमध्ये 2.25 टक्के इतकी वाढ रेपो रेटमध्ये केली. 

हेसुद्धा वाचा : बँक चेकबुकवरील IFSC आणि MICR Code मध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या

एसबीआयच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार 1-3 महिन्यांपासूनच्या एमसीएलआरमध्येही वाढ करण्यात आली असून, आता तो 7.75 वरून 8 टक्क्यांवर पोहोचला आहे. सहा महिन्यांपासून वर्षभरापर्यंतच्या एमसीएलआरमध्येही वाढ करण्यात आली. आता हा आकडा 8.05 वरून 8.30 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, दोन वर्षांसाठीचा एमसीएलआर 8.50 टक्के इतका झाला आहे. तीन वर्षांसाठीच्या एमसीएलआरम्ये 8.35 वरून 8.60 टक्के इतकी वाढ झाली आहे. 

रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट मध्ये नेमका फरक काय?

आरबीआय इतर बँकांना अल्पमुदतीचा वित्तपुरवठा करताना जो व्याजदर आकारते त्याला रेपो रेट म्हणतात. बँका याच पैशांमधून ग्राहकांना कर्ज देतात. त्यामुळे रेपो रेट कमी झाल्याने बँकेकडून ग्राहकांना कमी व्याजदरात कर्ज मिळते. त्यामुळे ग्राहकांना गृहकर्ज, वाहन कर्जासोबत इतर खासगी कर्ज घेताना फायदा होतो.
 
रिव्हर्स रेपो रेट हा रेपो रेटच्या पूर्ण विरुद्ध असतो. रिव्हर्स रेपो रेटमध्ये बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे जमा केलेल्या ठेवींवर व्याज मिळते. रिव्हर्स रेपो रेटच्या माध्यमातून मार्केटमध्ये लिक्वीडीटी कायम राहते. बाजारामध्ये मोठ्याप्रमाणात चलन उपलब्ध असल्याने रिझर्व्ह बँक रिव्हर्स रेपो रेट वाढवते. रिव्हर्स रेपो रेट वाढवल्याने बँका जास्त व्याज कमवण्याच्या उद्देशाने त्यांच्याकडील रक्कम रिझर्व्ह बँकेत जमा करतील अशी अपेक्षा रिझर्व्ह बँकेला असते.