दहशतवाद्याचा सामना करण्यास लष्कर पूर्णपणे सज्ज : रावत

सीमेपलीकडून दहशतवादी येतच राहणार. त्यांचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहे. भारतीय भूमीत घुसखोरी केलेल्या प्रत्येक दहशतवाद्याला अडीच फूट खोल धाडू, असा स्पष्ट इशारा जनरल बीपिन रावत यांनी दिल्लीत दिला आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 26, 2017, 07:53 AM IST
दहशतवाद्याचा सामना करण्यास लष्कर पूर्णपणे सज्ज : रावत title=

नवी दिल्ली : सीमेपलीकडून दहशतवादी येतच राहणार. त्यांचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहे. भारतीय भूमीत घुसखोरी केलेल्या प्रत्येक दहशतवाद्याला अडीच फूट खोल धाडू, असा स्पष्ट इशारा जनरल बीपिन रावत यांनी दिल्लीत दिला आहे. 

दरम्यान रविवारी खात्मा केलेल्या चार दहशतवाद्यांकडचा मोठा शस्त्रसाठा भारतीय लष्करानं ताब्यात घेतला आहे. याखेरीज दहशतवाद्यांकडून पाकिस्तानी बनावटीच्या इतरही वस्तू जप्त करण्यात आल्यात. 

जम्मू काश्मीरमधल्या उरी शहरात रविवारी ही चकमक झाली होती. दिवसभराच्या धुमश्चक्रीनंतर, चौघा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं. दरम्यान उरीमध्ये शोध मोहीम सुरुच असल्याचं लष्करानं सांगितलंय. 

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात उरीमध्ये केलेल्या हल्ल्याप्रमाणेच आणखी एक हल्ला करण्याच्या तयारीत हे दहशतवादी होते अशी माहिती लष्करानं दिलीय.