VIDEO : लुधियानामध्ये दिवसाढवळ्या बँकेसमोर लुटले १८ लाख रुपये

लुधियानाच्या राजगुरुनगर स्थित HDFC बँकेच्या बाहेर मंगळवारी शस्त्रधारी इसमांनी दिवसाढवळ्या प्रायव्हेट कलेक्शन कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून १८ लाख रुपये लुटले. 

Updated: Mar 21, 2018, 10:16 AM IST
VIDEO : लुधियानामध्ये दिवसाढवळ्या बँकेसमोर लुटले १८ लाख रुपये title=

लुधियाना : लुधियानाच्या राजगुरुनगर स्थित HDFC बँकेच्या बाहेर मंगळवारी शस्त्रधारी इसमांनी दिवसाढवळ्या प्रायव्हेट कलेक्शन कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून १८ लाख रुपये लुटले. 

पीडित कर्मचारी आपल्या दोन सहकाऱ्यांसह बँकेत पैसे जमा कऱण्यासाठी पोहोचले होते. यावेळी काही बदमाश व्यक्तींनी त्यांच्याकडून पैसे हिसकावून घेतले आणि फरार झाले.

दरोडेखोरांनी केली होती फायरिंग

मिळालेल्या माहितीनुसार, बचावाचा भाग म्हणून जेव्हा कंपनीच्या सिक्युरिटी गार्डने गोळी चालवण्याचा प्रयत्न केला तेव्हा दरोडेखोरांनीही फायरिंग केली आणि तेथून पळून गेले. घटनेच्या सूचनेनंतर पोलीस अधिकारी तेथे पोहोचले आणि तपास सुरु केला. पोलिसांनी बँकेच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे तपास सुरु केलाय.

दिवसाढवळ्या घडली घटना

दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलीये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरोज गांधी मार्केटमध्ये एसआयपीएल सिक्युर ट्रान्स नावाची कलेक्शन कंपनी आहे. ही फर्म प्रायव्हेट कंपन्यांकडून कॅश एकत्रित करुन बँकेत जमा करते. मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जेव्हा फर्मचे दोन कर्मचारी सिक्युरिटी गार्डसह कॅश जमा करण्यासाठी बँकेच्या समोर गेले तेव्हा या दरोडेखोरांनी ते पैसे लुटले. 

पोलिसांचा तपास सुरु

पोलिसांनी याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु केलाय.