अरब बाबा तोंडावर थुंकतो, दीड वर्ष 24 तास नोकर...गल्फमध्ये अडकलेल्या भारतीय तरुणीने सांगितली आपबीती

कुवेतमध्ये एका इमारतीला लागलेल्या आगीत 45 भारतीयांचा दुर्देवी मृत्यू झाला. यानिमित्ताने कुवेतमधल्या भारतीय कामगारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कुवेतमध्ये अडकलेल्या एका तरुणीने आपला भीषण अनुभव सांगितला आहे. ही तरुणी गेल्या दीड वर्षांपासून 14 जण राहात असलेल्या घरात कैद आहे.

राजीव कासले | Updated: Jun 15, 2024, 03:49 PM IST
अरब बाबा तोंडावर थुंकतो, दीड वर्ष 24 तास नोकर...गल्फमध्ये अडकलेल्या भारतीय तरुणीने सांगितली आपबीती title=

कुवेतमधल्या मंगाफ शहरात एका निवासी इमारतीला लागलेल्या आगाीत 50 लोकांचा मृत्यू झाला. यात 45 भारतीयांचा समावेश आहे. सहा मजली इमारतीला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर कुवेतमध्ये (Kuwait) राहाणाऱ्या परदेशी कर्मचाऱ्यांच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषत: भारतीय मोठ्या संख्येने गल्फमध्ये  (Gulf Nations) कामाला जातात. या महिलांचीही मोठी संख्या आहे. चमचमत्या शहरात चांगल्या कमाईची स्वप्न घेऊन जाणारे प्रत्यक्षात तिथल्या अंधारात हरवून जातात. जसमीत हा यापैकीच एक चेहरा.

गल्फ देशात लाखो भारतीय कामगार (Indian Workers) आहेत. यापैकी कुवेत, कतार आणि ओमानमध्ये भारतीयांची संख्या जास्त आहे. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्सच्या साईटनुसार गल्फ देशात जवळपास साढेसहा लाखाहून अधिक भारतीय आहेत. मोठ्या पदापेक्षा कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. 

दीड वर्षांपैासून कुवेतमध्ये
आज तक या वृत्तवाहिनीने कुवेतमधल्या जसमीत नावाच्या महिलेशी संपर्क साधत तिथल्या भारतीयांच्या राहाणीमानाचा अंदाज घेतला. जसमीत या गेल्या दीड वर्षांपासून ओमानमध्ये राहाते. तिच्याकडे ना पासपोर्ट आहे ना पैसे. पंजाबमध्ये राहाणारी 32 वर्षांची जसमीत एका एजेंटमार्फत गल्फ देशात पोहोचली. पंजाबमधल्या होशियारपूरमधल्या एका एजंटने तिला लाखभर पगार मिळवून देण्याचं आमिष दाखवलं. जसमीतच्या पतीला हेवी डायबेटिस आहे. तर सासरे आजारपणामुळे बिछान्यावर आहेत, लहान मुलगी आहे. घरात कमावणारं कोणी नसल्याने जसमीत दुबईला जाण्यासाठी तयार झाली. 

जसमीतला दुबईला पाठवण्याचं आश्वासन देण्यात आली होती, पण प्रत्यक्षात तिला ओमानला पाठवलं. तिथे अनेक दिवस तिला एक फ्लॅटमध्ये ठेवण्यात आलं. त्यानंतर तिला नोकरीसाठी एका कुटुंबात पाठवण्यात आलं. तब्बल 14 जणांचं हे कुटुंब होतं, आणि या कुटुंबाची सर्व कामं म्हणजे मोलकरीण, आचारी सर्व कामं तिलाच करावी लागतात आणि तेदेखील एकही दिवस सुट्टी न घेता. आठवड्याचे सात दिवस चोवीस तास जसमीतला त्यांची सर्व कामं करावी लागतात. जसमीतला घरातील एका लहान खोलीत राहाण्यासाठी जागा देण्यात आली असून या खोलीला कडीदेखील नाही. 

जसमीतला देण्यात आलेल्या खोलीत घरातील सर्व कचरा, टाकावू वस्तू, इस्त्रीचे आणि धुण्याचे कपडे ठेवले जात असल्याचंही तीने सांगितलं.घरातील सर्व जण म्हणजे 14 जणं जेवल्यानंतर जे अन्न उरतं ते जसमीतच्या वाटेला येतं.  धक्कादायक म्हणजे या घरात ती आपल्या देशाचं नाव घेऊ शकत नाही. कामात उशीर झाला की अनेकवेळा घरातील प्रमुख तिच्या तोंडावर थुंकतो, थूंक साफ करुन पुन्हा कामाला जावं लागतं, असंही तीने सांगितलं. 

जितके पैसे ठरवण्यात आले तितके कधीच दिले जात नाहीत, काही पैसे एजंटला दिले गेले असल्याचं सांगितलं जातं. जे काही पैसे उरतात ते जसमीत आपल्या घरी पाठवते. जसमीतला आपल्या कुटुंबाला काही दिवसांसाठी का होईना भेटायचंय, पण 15 दिवसांची सुट्टी हवी असेल तर 2 लाख रुपये जमा करण्यास तिला सांगितलं जातंय. ओमानमधले बरेचसे टॅक्सीवाल अरबी आहेत. एखादा भारतीय टॅक्सीत बसून भारतीय राजदूत किंवा विमानतळावर जाण्यासाठी निघाला की लगेच ते ओळखतात. मग भारतीयांना तिथे घेऊन जाण्यास ते नकार देतात. 

हिंदू आणि पंजाबी मुली
गल्फ देशात राहाणाऱ्या एका भारतीयाने दिलेल्या माहितीनुसार तिथे हिंदू आणि पंजाबी मुलींना आणलं जातं. चांगल्या नोकरीची, चांगल्या पगाराचं आमीष दाखवून त्यांना फसवलं जातं. त्यांच्याकडून पासपोर्ट आणि पैसेही काढून घेतले जातात. कोणी पळून जाण्याचा प्रयत्न केलाच तर पासपोर्ट नसल्याने त्यांना तुरुंगवास होऊ शकतो. या भीतीने अंगावर पडेल ते काम करण्यास या मुली तयार होता.