दिल्लीतील 11 जणांच्या मृत्यूच्या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा

ही मुलगी उलगडणार प्रकरणामागचं रहस्य...

Updated: Jul 8, 2018, 12:43 PM IST
दिल्लीतील 11 जणांच्या मृत्यूच्या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा title=

नवी दिल्ली : दिल्लीतील बुराडीमध्ये एकाच कुटुंबातील 11 व्यक्तींच्या मृत्यूने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. या घटनेमागचं गूढ अजूनही समोर आलेलं नाही. प्रत्येक दिवशी या प्रकरणात नवीन खुलासे होत आहे. पोलिसांनी वर्तवलेली आत्महत्येची चौकशी नातेवाईकांनी फेटाळली आहे.  आता दिल्लीतील या प्रकरणामध्ये आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. कुटुंबातील 12 पैकी 11 लोकांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती आता समोर आली म्हणजे. म्हणजेच या कुटुंबातील त्या व्यक्तीचा तपास आता सुरु झाला आहे जी मृत्यू झालेल्या 11 जणांमध्ये नव्हती. पोलीस या प्रकरणात आता या मुलीचा शोध घेत आहे.

घरात सापडलेल्या डायरीमध्ये या मुलीचा उल्लेख आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ती मुलगी ललित यांची पत्नी टीना यांची नातेवाईक आहे. डायरीमध्ये असा उल्लेख आहे की, त्या मुलीचं कुटुंब आर्थिक संकटात होतं, ललितने त्या मुलीला वड तपस्या करण्याचा सल्ला दिला होता. अशी शंका आहे की, ही मुलगी ललित यांच्या घरी येऊन पूजेमध्ये सहभागी झाली होती. डायरीमध्ये या मुलीचा उल्लेख आहे.

घरातील 11 जणांनीही सामूहिक आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे पण या प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहे. 1 जुलैला ही घटना समोर आली. पोलिसांना 7 महिला आणि 4 पुरुषांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले. सगळ्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती. हात बांधलेले होते. हे प्रकरण अंधश्रद्धेची जुडलेलं असल्याचं आतापर्यंत समोर आलेलं आहे.