भर रस्त्यात महिलेची 'भाईगिरी' डिलिव्हरी बॉयला चपलने मारलं, VIDEO व्हायरल

किरकोळ कारणावरुन महिलेचा पारा इतका चढला की तीने थेट मारहाणच सुरु केली

Updated: Apr 17, 2022, 02:06 PM IST
भर रस्त्यात महिलेची 'भाईगिरी' डिलिव्हरी बॉयला चपलने मारलं, VIDEO व्हायरल title=

जबलपुर : मध्य प्रदेशच्या संस्कारधानी जबलपूर इथला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. किरकोळ कारणावरुन एका महिलेने भर रस्यात डिलिव्हरी बॉयला चपलने मारहाण केली. अनेकांनी या महिलेला समजवण्याचा प्रयत्न केला. पण ती कोणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ही महिला केवळ मारहाणीवर थांबली नाही तर तीने या डिलिव्हरी बॉयची पोलिसातही तक्रार दिली.

व्हायरल झालेला व्हिडिओ जबलपूरच्या रसाल चौक भागातील असल्याचं सांगितलं जात  आहे. मोबाईलवर बोलत ही महिला स्कूटी चालवत होती. तितक्यात समोरुन बाईकवर येणाऱ्या डिलिव्हरी बॉयने तिच्या स्कूटीला धडक दिली. ही धडक अगदी किरकोळ होती. पण ही महिला इतकी संतापली की तीने स्कूटीवरुन उतरत त्या डिलिव्हरी बॉयला मारहाण करायला सुरुवात केली. इतकंच नाही तर तीने त्याच्या बाईकला लाथा मारल्या.

भर रस्त्यात ही घटना होत असताना बघ्याची गर्दीही वाढली. अनेकांनी या महिलेला समजवण्याचा प्रयत्न केला. पण या महिलेने त्यांचं न ऐकता लोकांच उलट उत्तरं दिली. त्यानंतर या महिलेने त्या डिलिव्हीर बॉयविरुद्ध पोलिसातही तक्रार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला ताब्यात घेत त्याची चौकशी केली.