तिरुमाला : आंध्र प्रदेशच्या तिरुमाला येथे एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. इथल्या एका कारच्या इंजिनमध्ये साप बसला होता. सापाला बाहेर काढण्यासाठी वन विभागाची टीम बोलवण्यात आली. यानंतर मोठ्या पराकष्ठेने सापाला कारच्या इंजिनमधून बाहेर काढण्यात आले. ही घटना आंध्र प्रदेश येथील चित्तूर जिल्ह्यातील घडली. हा साप साधारण ८ फुटांचा असून याला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. कारच्या इंजिनमधे सापडल्याने लोक हैराण झाले आहेत.
ज्या कारमध्ये हा साप सापडला ती सतत प्रवासात असते. अशावेळी जंगल भागात असताना कदाचित टायरच्यामार्गे गाडीचे तो इंजिनमध्ये जाऊन लपला असावा असा तर्क लावण्यात येतोय.
जेव्हा ड्रायव्हर गाडीचे ऑईलिंग करण्यासाठी बोनेट उघडायला गेला तेव्हा समोरच दृश्य पाहुन हैराण झाला.
एक साप फणा उभारुन त्याच्यासमोर होता. यानंतर वन विभागाच्या टीमला पाचारण करण्यात आले. वन विभागाने सापाला जवळच्या जंगलात सोडले.