Anand Mahindra Tweet: आनंद महिंद्रा हे कायमच सोशल मीडियावर एक्टिव (Anand Mahindra Latest Tweet) असतात त्यामुळे त्यांना फॉलो करणारे त्यांचे चाहतेही कायमच त्यांच्या नव्या ट्विटची वाट पाहत असतात. सध्या त्यांचा असाच एक व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होतो आहे. यंदा या व्हिडीओनं पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या या व्हिडीओला 1.3 मिलियन व्ह्यूज आले आहेत. त्याचसोबत या व्हिडिओखाली अनेकांनी कमेंट्सही (Video) केल्या आहेत. परंतु असं या व्हिडीओत काय आहे आणि तो त्यांच्या चाहत्यांना का आवडला आहे याचं उत्तर तुम्हाला हा व्हिडीओ (Foldable Video Shared By Anand Mahindra) पाहूनच कळेल. हा व्हिडीओ त्यांनी याआधीही पोस्ट केल्याचं तुम्हाला आठवत असेल. होय, तसाच व्हिडीओ त्यांनी पुन्हा एकदा शेअर केला आहे. या व्हिडीओतील गोष्ट तुमच्या आमच्या फायद्याची आहे.
या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, 500 स्केवर फूटचं हे घरं तुम्ही अक्षरक्ष: दुमडू शकता. तेव्हा तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्ही तुमच्यासोबत हे घरीही घेऊन जाऊ शकता. हे ट्विट करताना आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आपल्या देशात कदाचित इतके स्वस्त घरं झाले नसेल. या फोडेबल 500 स्केअर फूट घराच्या किंमत 40 लाख रूपये एवढी आहे. या घरांचा उपयोग मोठ्या नैसर्गिक आपत्तीनंतरही (Innovation) होऊ शकतो. एफॉर्टेबल होम मिळवण्याच्या समस्येवर हा एक चांगला पर्याय आहे, असं ट्विट त्यांनी केले आहे.
महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra MAHINDRA Company) यांनी या व्हिडीओतून एक नवं इन्होवेशन जगासमोर आणलं आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे हे घरं हळूहळू उघडत आहे आणि त्याच्या आतील गंमत आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यामुळे या व्हिडीओतून आपल्याला या नव्या घराची ओळख होते आहे. हे घर क्रेनच्या साहाय्यानं फोल्ड केलेलं उघडलं जातं आहे. या घरात तुम्हाला हव्या त्या सर्व सुविधाही आहेत. त्याचबरोबर या व्हिडीओला भरपूर लाईक्सही आले आहेत. हा व्हिडीओ 40 सेकंदाचा (Viral Video) आहे. त्यातून हे घरंही खूप लक्झरीयस दिसतं आहे.
हेही वाचा - Money Laundering प्रकरणामध्ये Nora fatehi चं वक्तव्य समोर, सुकेश चंद्रशेखरचं काय होणार?
An un-foldable, 500 sq ft house for about 40L rupees. Probably could be manufactured even cheaper in India. Perfect for post-disaster shelters also. Innovation is the answer to our problems of providing affordable homes. pic.twitter.com/1CRPPpvla1
— anand mahindra (@anandmahindra) January 12, 2023
आनंद महिंद्रा यांचे सोशल मीडियावर भरपूर फॉलोवर्स आहेत त्याचसोबत एव्हाना त्यांचे फॉलोवर्सही वाढू लागले आहेत. हा व्हिडीओ त्यांनी याआधीही शेअर केला होता. त्यांच्या या व्हिडीओला तेव्हाही पुष्कळ लाईक्स आले होते आणि हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरलही झाला होता.