Gujarat Earthquake: गुजरातमध्ये (Gujarat) भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रविवारी दुपारी गुजरातमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती National Center for Seismology ने दिली आहे. दुपारी 3 वाजून 21 मिनिटांनी हे धक्के जाणवले. राजकोटच्या (Rajkot) उत्तर वायव्येला (NNW) 270 किलोमीटर अंतरावर भूकंपाचं केंद्र असल्याची माहिती देण्यात आली आहे. भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Earthquake of Magnitude:4.3, Occurred on 26-02-2023, 15:21:12 IST, Lat: 24.61 & Long: 69.96, Depth: 10 Km ,Location: 270km NNW of Rajkot, Gujarat, India for more information Download the BhooKamp App https://t.co/Hiu0hB3Qm6@ndmaindia @NDRFHQ @Indiametdept @Dr_Mishra1966 pic.twitter.com/I0HG5TjllI
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) February 26, 2023
गेल्या आठवड्यात गुजरातमधील अमरेली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. Institute of Seismological Research ने पीटीआयच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, अमरेली जिल्ह्यात दोन दिवसांत भूकंपाचे तीन धक्के जाणवले होते.