नसीरुद्दीन शाहंना 'या' नेत्याकडून पाकिस्तानचे तिकिट

14 ऑगस्टला पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन आहे आणि 15 ऑगस्टला आमच्या देशातील एक गद्दार कमी होईल', असे त्यांनी म्हटले. 

Updated: Dec 21, 2018, 06:05 PM IST
नसीरुद्दीन शाहंना 'या' नेत्याकडून पाकिस्तानचे तिकिट  title=

नवी दिल्ली : बॉलीवुड अभिनेता नसीरुद्दीन शाह हे आपल्या वक्तव्यामुळे वादात सापडले आहेत.  'देशात सध्या सुरू असलेल्या वातावरणात राहायला भीती वाटते. असं न होवो की उद्या मुलांना कुणी गल्लीत उभं करून विचारलं की, तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम ?' अशी भीती नसीरूद्दीन शाह यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर देशभरातून टीका करण्यात आली. अनेकांनी नसीरुद्दीन यांना शिव्यांची लाखोली वाहिली तर त्यांचे पोस्टर्सही जाळण्यात आले. आता तर एक नवा प्रकार समोर आलाय. नसीरुद्दीन यांच्या घरच्या पत्त्यावर पाकिस्तानचे विमान तिकिट पाठवण्यात आले आहे. उत्तर प्रदेश नवनिर्माण सेना प्रमुख अमित जानी यांनी हे तिकिट नसीरुद्दीन यांच्यासाठी बुक केले आहे. 

अमित जानी यांनी 14 ऑगस्ट 2019 चे मुंबईहून कराचीला जाणाऱ्या विमानाचे तिकिट बुक केले आहे. टनसीरुद्दीन यांना भारतात राहण्याची भीती वाटत असेल तर वेळ न दवडता ते पाकिस्तानात जाऊ शकतात. 14 ऑगस्टला पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन आहे आणि 15 ऑगस्टला आमच्या देशातील एक गद्दार कमी होईल', असे त्यांनी म्हटले.

वादग्रस्त वक्तव्याला विरोध झाल्यावर नसीरूद्दीन शाह यांची सारवा सारव

'तिकिटाची व्यवस्था करु'

एवढे बोलूनच अमित जानी थांबले नाहीत. जर नसीरुद्दीन यांना इतकीच भीती वाटते तर त्यांनी हनुमान चालीसा वाचावी. तसंही हनुमानाला मुस्लिम ठरविण्यात येत आहे. त्यामुळे इस्लाममध्ये याला विरोध होणार नाही. ज्या कोणाला भारतात भिती वाटतेय त्यांनी ते पाकिस्तानात जाऊ शकतात. जाण्याची व्यवस्था आमचा पक्ष करेल असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

'योगी पंतप्रधान व्हावे'

योगी आदित्यनाथ जेव्हा गोरखपूरचे खासदार होते तेव्हा त्यांनीही भारतात राहण्याची भिती वाटणाऱ्यांना पाकिस्तानात जाण्यास सांगितले होते. आम्ही त्यांचा शब्द पाळतोय असेही अमित जानी म्हणाले. अमित जानी यांनी लखनऊ आणि दिल्लीमध्ये  #Yogi4PM चे पोस्टर लावले होते.

या पोस्टर्समध्ये त्यांनी योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान बनवावे आणि नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावरून हटवावे अशी मागणी केली होती.