कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा रद्द; 28 जूनपासून भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा

यंदाची पवित्र अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. मागील वर्षी कोविड 19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती.

Updated: Jun 21, 2021, 06:59 PM IST
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा रद्द; 28 जूनपासून भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा title=

नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या चर्चांमध्ये पवित्र अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. मागील वर्षी कोविड 19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती. भाविकांना 28 जून पासून ऑनलाईन दर्शनाची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. 

लोकांचे प्राण वाचणे जास्त गरजेचे

जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या कार्यालयद्वारा आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलरवरून सांगण्यात आले की, कोविड 19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. श्राइन बोर्डाच्या सदस्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ही यात्रा केवळ प्रतिकात्मक होणार आहे. दरम्यान सर्व धार्मिक विधी नियोजित कार्यकाळानुसार होणार आहेत. सध्याच्या परिस्थितीत लोकांच्या आरोग्याचा विचार करता तीर्थयात्रा आयोजित करणे योग्य ठरणार नाही.

अमित शहा यांच्यासोबत झाली बैठक

उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी जम्मू काश्मीरच्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आयोजित केलेल्या बैठकीत उपस्थिती लावली.  या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला, गुप्तचर अधिकारी आदी उपस्थित होते.