म्हणून एअर इंडियाला लाखाभराचा दंड ठोठावला

नाश्त्यामध्ये कीड आढळल्याने प्रवाशाच्या तक्रारीनंतर एअर इंडियाला लाखभराचा दंड ठोठावला आहे.  इलाहाबाद कोर्टाने प्रवाशाला झालेल्या त्रासाचा मनस्ताप म्हणून एक लाखाचा दंड आणि  केस चालवण्यासाठी ५००० रूपये देण्यास सांगितले आहे. 

Updated: Oct 29, 2017, 02:06 PM IST
म्हणून एअर इंडियाला लाखाभराचा दंड ठोठावला  title=

अलाहाबाद : नाश्त्यामध्ये कीड आढळल्याने प्रवाशाच्या तक्रारीनंतर एअर इंडियाला लाखभराचा दंड ठोठावला आहे.  इलाहाबाद कोर्टाने प्रवाशाला झालेल्या त्रासाचा मनस्ताप म्हणून एक लाखाचा दंड आणि  केस चालवण्यासाठी ५००० रूपये देण्यास सांगितले आहे. 

उशीर झाल्यास ८ % व्याज  
ठोठावलेला दंड दोन महिन्यात न दिल्यास एअरइंडियाला ८ % व्याज अतिरिक्त द्यावे लागेल. 

काय आहे नेमकं प्रकरण ?  
 डॉ. नीलम मित्तल यांनी कोलकत्ता ते पोर्ट ब्लेअर हे सुमारे १२,९९० रूपयांचे तिकीट विकत घेतले. ८ जून २००८ साली सायंकाळी ५.३० वाजता हे विमान टेक ऑफ करणं अपेक्षित होते. मात्र ते ६.३० वाजता निघाले. प्रवासादरम्यान दिलेल्या नाश्त्यामध्ये कीड सापडल्याची तक्रार केली. त्यानंतर दुसरा नाश्तादेखील दिला नव्हता.  

 प्रवाशांना दिलेल्या नाश्त्याचे पैसेदेखील तिकीटामध्ये होते. पण तरीही तक्रारीची दखल घेतली जात नव्हती.