बंगळुरु : एकीकडे कर्नाटकमध्ये बहुमत मिळवण्यासाठी भाजपचे नेते जिवापाड प्रयत्न करत होते. काँग्रेस आणि जेडीएस आपले आमदार फुटू नये म्हणून सतर्क होते. तर दुसरीकडे जेडीएसचे हे आमदार आपल्या माकडासोबत जेवत होते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. 4 दिवसांपासून कर्नाटकात सत्ता संघर्ष पाहायला मिळत होता. संपूर्ण देशाचं लक्ष या बहुमत चाचणीकडे होतं. कर्नाटकातील सगळेच आमदार चिंतेत होते की पुढे काय होणार आहे. पण जेडीएसचे एक आमदार या सर्व चिंतेपासून दूर माकडासोबत बसून कर्नाटकातील प्रसिद्ध पदार्थ रागी मुड्डे खात होते आणि माकडाला ही भरवत होते.
#KarnatakaElections2018
Tumkur chikkanayakanahalli MLA from JdS CB Suresh Babu feeding raagi mudde to monkey before proceeding to vote @NewIndianXpress pic.twitter.com/8scNSPbu5c— Ashwini M Sripad (@AshwiniMS_TNIE) May 12, 2018
एका महिला पत्रकाराने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ चर्चेत आला आहे. पण जेडीएसचे आमदार सुरेश बाबू असं का करत होते याची कोणताही माहिती अजून समोर आलेली नाही.