रजनीकांत आणि पंतप्रधान मोदींची भेट, काय झाली चर्चा?

सुपरस्टार रजनीकांत भाजपमध्ये प्रवेश करणार याची चर्चा रंगली असताना त्यांनी सोमवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली.

Updated: Nov 7, 2017, 08:13 AM IST
रजनीकांत आणि पंतप्रधान मोदींची भेट, काय झाली चर्चा? title=

चेन्नई : सुपरस्टार रजनीकांत भाजपमध्ये प्रवेश करणार याची चर्चा रंगली असताना त्यांनी सोमवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्याठिकाणी रजनीकांत आणि अनेक दिग्गजांची भेट घेतली. तब्बल २५ मिनिटे भाषण करून मोदी स्टेजवरून खाली आले आणि रजनीकांट यांची भेट घेतली. त्यांच्यात जास्त चर्चा झाली नाही पण कारण इतरही नेत्यांना मोदींना भेटायचे होते. 

अभिनेता कमल हसन यांच्या हिंदूच्या वक्तव्यामुळेही सध्या वातावरण तापलं आहे. अशात मोदी आणि रजनीकांत यांची भेट झाल्याने अनेक चर्चा होत आहे. कमल हसन यांनी सुद्धा राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी अनेकदा भाजपवर टीका केली आहे. त्यामुळे रजनीकांत हे भाजपसाठी पर्यायी ठरू शकतात. 

कमल हसन यांनी तमिळ वॄत्तपत्र ‘आनंद विकटन’ मध्ये एक लेख लिहिला होता. त्यात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर भाजप नेत्यांनीही जोरदार टीका केली होती. रजनीकांत आणि पंतप्रधान मोदी यांची ही पहिलीच भेट नाहीये. याआधी या दोघांच्या अनेक भेटी झाल्या.