Airtel आणि Nokia ने मिळून केले 5G चे ट्रायल; 1000 MBPSच्या भन्नाट स्पीडने चालणार इंटरनेट

देशात 5G सेवा सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती येताना दिसत आहे. टेलिकॉम ऑपरेटर्स सध्या सेवेची ट्रायल घेत आहेत. 

Updated: Jul 13, 2021, 10:32 AM IST
Airtel आणि Nokia ने मिळून केले 5G चे ट्रायल; 1000 MBPSच्या भन्नाट स्पीडने चालणार इंटरनेट title=

मुंबई : देशात 5G सेवा सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती येताना दिसत आहे. टेलिकॉम ऑपरेटर्स सध्या सेवेची ट्रायल घेत आहेत. भारती एअरटेलने नोकियासोबत मिळून मुंबईत 5G चे ट्रायल केले आहे.

मुंबईत फिनिक्स मॉलमध्ये ट्रायल सुरू 
एअरटेलने मुंबईच्या फिनिक्स मॉलमध्ये फिनलँडची कंपनी नोकियाच्या गियरचा वापर करीत 5G ट्रायल केले. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रायलच्या दरम्यान, एअरटेलने 1 गीगाबाईट प्रतिसेकंदाची अधिक इंटरनेट स्पीड रेकॉर्ड केली आहे.

एअरटेलने मुंबईत लोअरपरेल येथून या ट्रायलला लाइव्ह केले आहे. कंपनीच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली आहे.

ट्रायलमध्ये एअरटेलचा रेकॉर्ड
सूत्रांच्या मते दूरसंचार विभागच्या गाईडलाइन्सनुसार एअरटेल नोकियाच्या 5G गिअर वापरून 3500 मेगाहर्ट्ज बँडचा ट्रायल करीत आहे. ट्रायल दरम्यान एअरटेलने अल्ट्रा-लो लटेंसीसह 1 गीगाबाईट प्रतिसेकंदहून अधिक इंटरनेट स्पीड रेकॉर्ड केली आहे. 

लवकरच शहरांमध्ये ट्रायल
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअरटेल आणि नोकियाने कोलकतामध्येदेखील 5G ट्रायल सुरू करण्याचे नियोजन केले आहे.