Air violations by China : चीनचं शेपूट वाकडं ते वाकडंच. एकीकडं भारत-चीन सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी कमांडर स्तरावर चर्चा केली जातेय. तर दुसरीकडं चीनच्या फायटर विमानांची घुसखोरी सुरूच आहे. भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील नो फ्लाईंग झोनमध्ये चीनची फायटर विमानं घिरट्या घालतायत. गेल्या तीन-चार आठवड्यांपासून हे प्रकार वाढले आहेत.
भारतीय सैन्याचं जशास तसं उत्तर
लडाखमध्ये भारतीय सैन्यानं चीनच्या दादागिरीला मुँहतोड जबाब दिला. त्यामुळं चवताळलेल्या चिनी सैन्यानं भारतावर दबाव टाकायला सुरूवात केलीय. तैवानच्या बाजूनं चिनी फायटर विमानं भारतावर घिरट्या घालतायत.
भारतीय सैन्याला चिथावण्याचा डाव यामागं असल्याचं समजतंय. त्याचा मुकाबला करण्यासाठी भारतानं राफेलच्या माध्यमातून युद्ध सराव सुरू केलाय. त्याशिवाय एस 400 क्षेपणास्त्र देखील सीमेवर तैनात केली जाणार आहेत
कावेबाज चीननं तैवान आणि जपानविरोधात जी रणनीती आखली, त्याचाच प्रयोग आता भारताविरुद्ध केला जातोय. आधी फायटर विमानं पाठवायची आणि शत्रूराष्ट्राच्या संरक्षण तयारीचा आढावा घ्यायचा, हा चीनचा डाव आहे. मात्र हा रडीचा डाव भारत कधीच सफल होऊ देणार नाही.