एअर इंडियाच्या विमानात आता मिळणार फक्त शाकाहारी पदार्थ?

गेल्या काही दिवसापासून सरकारी विमान वाहक एअर इंडियाच्या विक्रीची चर्चा जोरदार सुरू आहे. दरम्यान खर्च कपातीच्या दृष्टीनं एअर इंडियानं एक वेगळंच पाऊल उचचलं आहे. इकॉनोमी क्लासनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यापुढे एअर इडियाच्या विमानात चिकनचे पदार्थ सर्व्ह करण्यात येणार नाहीत. .नुकताच याविषयीचा निर्णय घेण्यात आला.

Updated: Jul 10, 2017, 10:06 AM IST
एअर इंडियाच्या विमानात आता मिळणार फक्त शाकाहारी पदार्थ? title=

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासून सरकारी विमान वाहक एअर इंडियाच्या विक्रीची चर्चा जोरदार सुरू आहे. दरम्यान खर्च कपातीच्या दृष्टीनं एअर इंडियानं एक वेगळंच पाऊल उचचलं आहे. इकॉनोमी क्लासनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यापुढे एअर इडियाच्या विमानात चिकनचे पदार्थ सर्व्ह करण्यात येणार नाहीत. .नुकताच याविषयीचा निर्णय घेण्यात आला.

एअर इंडियावर सध्या 33 हजार कोटींच्या कर्जाचा बोजा आहे. त्यामुळे आता एअर इंडियाचं तिकीट बुक करताना इकॉनोमिक क्लासच्या तिकीटासोबतचा मेन्यूमध्ये अंडी वगळता शाकाहारीच पदार्थ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.