बापरे! एअर इंडियाच्या 600 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात? कंपनी केव्हाही सांगू शकते...

Air India-Vistara Merger Update: जागतिक आर्थिक मंदीमुळं अनेक क्षेत्रांमधील नोकऱ्या धोक्यात असल्याचं आजवर पाहायला मिळालं. आता यामध्ये एअर इंडियातील कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा मुद्दासुद्धा ऐरणीवर आला आहे.   

सायली पाटील | Updated: Jul 12, 2024, 09:54 AM IST
बापरे! एअर इंडियाच्या 600 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात? कंपनी केव्हाही सांगू शकते...  title=
(प्रतिकात्मक छायाचित्र) Air India Vistara Merger 600 employees jobs in danger

Air India-Vistara Merger Update: टाटा उद्योग (TATA Group) समुहाच्या अख्तयारित येणाऱ्या विमानसेवा पुरवणाऱ्या एअर इंडिया आणि विस्तारा (Vistara) या दोन्ही कंपन्यांमध्ये विलिनीकरणाची प्रक्रिया सुरु असून, यंदाच्याच वर्षी सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत या दोन्ही कंपन्यांमध्ये सुरु असणारी ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकिडके विलिनीकरणाची प्रक्रिया सुरु असतानाच दुसरीकडे जवळपास 600 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची चिन्हंही आता स्पष्ट दिसू लागली आहेत. 

कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय 

प्राथमिक माहितीनुसार एअर इंडियाकडून या संभाव्य 600 कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. पीटीआयच्या माहितीनुसार हे 600 कर्मचारी विमानाच्या उड्डाण प्रक्रिया विभागातील नसल्याचं सांगण्यात आलं असून, या प्रक्रियेदरम्यान वैमानिक किंवा केबिन क्रू यांच्या नोकरीला कोणताही धोका नसल्यासं म्हटलं जात आहे. (Air India Jobs) 

एअर इंडियातील एकूण कर्मचारीसंख्या किती? 

सध्याच्या घडीला एअर इंडियामध्ये जवळपास 23000 कर्मचारी सेवेत असून, हा आकडा त्याहीपेक्षा मोठा असल्याचं सांगितलं जातं. येत्या काळात विमानसेवा क्षेत्रामध्ये एअर इंडियाला आणखी कार्यक्षम करण्याच्या हेतूनं कंपनीकडून या विलिनीकरणाची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांवर या प्रक्रियेचा परिणाम होणार असला तरीही नेमका किती कर्मचाऱ्यांवर हा प्रभाव दिसेल यासंबंधिचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. 

हेसुद्धा वाचा : 'ही बेरोजगारीची महामारी...' नोकरीसाठी खस्ता खाणाऱ्या तरुणाईला पाहून राहुल गांधी पंतप्रधांना थेट म्हणाले... 

एअर इंडियामधून नोकरी गमावणाऱ्या किंवा स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांपुढं नोकरीचा प्रश्न उभा राहू न देण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचं हित लक्षात घेता टाटा समुहाच्याच अख्तयारित येणाऱ्या इतर कंपन्यांमध्ये त्यांना नोकरी दिली जाऊ शकते. नोकरी न मिळाल्यास समुहापासून स्वेच्छेनं विभक्त होण्यासाठी त्यांना एक खास रक्कम समुहाकडून दिली जजाणार आहे. या प्रक्रियेसाठी सध्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांची पदं आणि त्यांच्या कामाच्या स्वरुपासह त्यांच्या जबाबदाऱ्यांचा आढावा घेतला जात आहे.