Halal Food in Air India: कायमच प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत एअर इंडियाच्या वतीनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातात आणि याची पु़न्हा एकदा प्रचिती आली आहे. हलाल सर्टिफाइड प्रोडक्टसंदर्भात एअर इंडियानं नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. टाटांच्या मालकीच्या या कंपनीकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार इथून पुढं हिंदू आणि शीख प्रवाशांना हलाल मांस दिलं जाणार नाही.
विस्ताराशी मर्जर यशस्वी करण्यासोबतच एअर इंडियानं आता व्यवस्थापनात सुधारणा आणत प्रवाशांच्या खाण्यापिण्याच्या सुविधांसंदर्भातही काही महत्त्वाचे निर्णय घेत Pre Booking अनिवार्य केली आहे.
एअर इंडिया (Air India)च्या नव्या आदेशानुसार इथून पुढं फक्त एमओएमएल अर्थात आधी उल्लेख केल्या जाणाऱ्य़ा Muslim Food साठीच हलाल प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. हे खाणं प्रवाशांना Pre Booking अंतर्गत उपलब्ध असेल. सौदी आणि हजसाठीच्या उड्डाणांमध्ये सर्व पद्धतीचं हलाल मांस उपलब्ध असेल. याशिवाय जेद्दा, दम्मम, रियाद, मदीना सेक्टरसाठीच्या विमानांमधील खाण्यालाही हलाल प्रमाणपत्र दिलं जाईल.
काही काळापूर्वी हलाल सर्टिफाइड पदार्थांना (Halal Certified Food) मुस्लिम मील (Muslim Meal) असं नाव दिल्यामुळं एअर इंडियावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. ज्यामुळं आता हे नाव हटवून कंपनीनं स्पेशल मील (Air India Special Meal) या शब्दाचा उल्लेख करत त्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचनासुद्धा जारी केल्या आहेत.
एअर इंडियानं ज्यावेळी मुस्लिम मील नावानं काही पदार्थ प्रवाशांसाठी सादर केले तेव्हा त्यांच्या या उपक्रमाचा कडाडून विरोध करण्यात आला होता. राजकीय पक्षांपासून प्रवाशांपर्यंत सर्वच स्तरांतून या उपक्रमाला आणि पर्यायी एअर इंडियाला रोषाचं धनी व्हावं लागलं होतं. आता अन्नालाही हिंदू, मुस्लिम असं विभागणार.... असं म्हणत या निर्णयावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. ज्यानंतर मुस्लिम मील हा शब्द हटवत तिथं स्पेशल मील असा उल्लेख करण्यात येताना दिसत आहे.