तामिळनाडूमध्ये राजकीय घमासान, AIADMKत बंडाळी उफाळली

तामिळनाडूमध्ये राजकीय घमासान सुरुच आहे.  AIADMK मध्ये नवी अंतर्गत बंडाळी उफाळून आलीये. पलानीस्वामी-पनीरसेल्वम समर्थकांनी पक्षाचे उप महासचिव टीटीव्ही दिनकरन यांचा पुतळा जाळला.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 23, 2017, 10:21 PM IST
तामिळनाडूमध्ये राजकीय घमासान,   AIADMKत  बंडाळी उफाळली title=

हैदराबाद : तामिळनाडूमध्ये राजकीय घमासान सुरुच आहे.  AIADMK मध्ये नवी अंतर्गत बंडाळी उफाळून आलीये. पलानीस्वामी-पनीरसेल्वम समर्थकांनी पक्षाचे उप महासचिव टीटीव्ही दिनकरन यांचा पुतळा जाळला.  

दिनकरन यांनी समर्थक आमदारांच्या जोरावर सरकारचा पाठिंबा काढलाय. त्यामुळे उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम आणि मुख्यमंत्री पलानीस्वामी यांचा गट संतापलाय. तसंच पक्षातल्या पदांवर आपली माणसं नेमत दिनकरन यांनी मुख्यमंत्र्यांना काटशह दिलाय. 

आपल्या समर्थक आमदारांच्या बळावर नवीन मुख्यमंत्री नेमणार असल्याचं दिनकरन यांनी सांगितलंय. पुदुच्चेरी जवळील एका रिसॉर्टमध्ये दिनकरन समर्थक आमदार थांबलेत.  दरम्यान पार्टी फोरमच्या सेक्रेटरीपदावरुन महसूलमंत्री आर. बी. उदयकुमार यांची दिनकरन यांनी हकालपट्टी केली आहे.