गुजरातमध्ये अपघात, महाराष्ट्रातील ११ जण ठार

देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या जीपला झालेल्या अपघातात महाराष्ट्रातील ११ जण ठार झाले आहेत. हा अपघात गुजरातमधील अहमदाबाद येथे धंधुका बरवाला रस्त्यावर झाला. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 27, 2017, 09:36 AM IST
गुजरातमध्ये अपघात, महाराष्ट्रातील ११ जण ठार title=

अहमदाबाद : देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या जीपला झालेल्या अपघातात महाराष्ट्रातील ११ जण ठार झाले आहेत. हा अपघात गुजरातमधील अहमदाबाद येथे धंधुका बरवाला रस्त्यावर झाला. 

प्राथमिक माहितीनुसार, अपघातात मृत्यूमुखी पडलेले सर्वजण हे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. मात्र, हे रहिवासी नेमके कोणत्या भागातील आहेत याबाबत अद्याप माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. हे सर्व भाविक भावनगरमध्ये देवदर्शनाला निघाले होते. दरम्यान, भाविकांची जीप आणि ट्रक यांची धडक होऊन हा अपघात घडल्याचे समजते.

मृतांमध्ये ५ महिलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.