ऑस्ट्रेलियात पत्नीच्या हत्येनंतर मुलासह तो भारतात, सासरी जाऊन म्हणाला, 'तुमच्या नातवाला ठेवा अन् तुमची मुलगी...'

Woman Murdered In Australia : ऑस्ट्रेलियात पत्नीची हत्या करुन मृतदेह कचराकुंडीत फेकला. त्यानंतर मुलासह तो भारतात हैदराबादला आला. सासरी जाऊन त्याने मुलाला पत्नीच्या आई वडिलांच्या स्वाधीन केलं. 

नेहा चौधरी | Updated: Mar 11, 2024, 02:57 PM IST
ऑस्ट्रेलियात पत्नीच्या हत्येनंतर मुलासह तो भारतात, सासरी जाऊन म्हणाला, 'तुमच्या नातवाला ठेवा अन् तुमची मुलगी...' title=
After wife murder in Australia husband with child in India father in law goes and says Keep your grandson and your daughter

Hyderabad Woman Murdered In Australia : ऑस्ट्रेलियात एका कचराकुंडीत भारतीय महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. ही महिला हैदराबादमधील असून तिच्या हत्येचा काही वेळातच मुलगा आणि नवऱ्या भारतात परतले. 36 वर्षीय महिलचं नाव चैतन्य मधागानी असल्याचं पीटीआयने दिलेल्या माहितीमध्ये म्हटलंय. ही महिला आपल्या पती आणि मुलासह ऑस्ट्रेलियाला राहत होती. तिचा मृतदेह घराजवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या डस्टबिनमध्ये आढळून आला. हैदराबाद उप्पलचे आमदार बंदरी लक्ष्मा रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिला ही त्यांच्या मतदारसंघातील आहे. (After wife murder in Australia husband with child in India father in law goes and says Keep your grandson and your daughter)

या महिलेची हत्या तिच्या पतीने केल्याचा संशय ऑस्ट्रेलियन पोलिसांना आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यातील पॉइंट कुक इथे ही कुटुंब राहत होते. त्यांना 4 वर्षांचा मुलगा असून त्याच नाव आर्या आहे. चैतन्य हिचा नवरा अशोक यांचं लव्ह मॅरेज होतं. या दोघा नवऱ्या बायकोमध्ये वारंवार वाद व्हायचा असं महिलेच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे. महिलेचं तिच्या आई वडिलांशी 5 मार्चला शेवटचं बोलणं झालं होतं. 

त्यानंतर अशोक आर्यासोबत 9 मार्चला ऑस्ट्रेलियाहून त्यांच्या सासरे बालसेट्टी गौर यांच्याकडे घरी पोहोचला. इथे त्याने पत्नीच्या आई वडिलांना सांगितलं की, आमचं 5 मार्चला जोरदार भांडण झालं. त्यानंतर मी चैतन्यचा गळा दाबला ज्यामुळे तिचा अपघाती मृत्यू झाला. हे सांगून त्याने तुमचा नातवाला तुमच्याकडे ठेवा असं म्हटलं आणि तिथून निघून गेला. 

आता बालसेट्टी गौर यांना मुलीचा मृतदेह भारतात आणायचा आहे. आमदार बंडारी लक्ष्मा रेड्डी यांनी आई वडिलांच्या विनंतीनंतर परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहिलं आहे. दरम्यान आमदाराने अशी माहिती दिली आहे की, अशोकने आपल्या पत्नीची हत्या केल्याची कबुली सासरच्या लोकांना दिली आहे. पत्नीच्या हत्येनंतर त्याला मुलाला अनाथ करायचं नव्हतं म्हणून त्यांनी भारत गाठवल्याचं म्हटलं आहे. त्याशिवाय ऑस्ट्रेलियन पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याची इच्छाही त्याने बोलून दाखवली आहे, असं आमदाराने सांगितलं.