'चंद्रासाठी काहीपण...'म्हणत विक्रम लँडरमागोमाग चंद्रावर प्रज्ञान रोवरचं भ्रमण सुरु

Chandrayaan 3 Rover Landing on Moon: 'चंद्रासाठी काहीपण...'म्हणत विक्रम लँडरमागोमाग चंद्रावर प्रज्ञान रोवरचं भ्रमण सुरु   

सायली पाटील | Updated: Aug 24, 2023, 10:22 AM IST
'चंद्रासाठी काहीपण...'म्हणत विक्रम लँडरमागोमाग चंद्रावर प्रज्ञान रोवरचं भ्रमण सुरु  title=
(प्रतिकात्मक छायाचित्र) / after successful landing Chandrayaan 3 rover walks on moon latest update

Chandrayaan 3 Rover Landing: (ISRO) इस्रोनं पाठवलेल्या चांद्रयान 3 नं 23 ऑगस्ट 2023 ला चंद्राचं दक्षिण ध्रुव गाठलं आणि अशक्य वाटणारी मोहिम अगदी सहजपणे पार केली. विक्रम लँडरनं चंद्रावर पाऊल ठेवताच एक संदेशही पाठवला ज्यामध्ये त्यानं आपण निर्धारित स्थळी पोहोचल्याचं म्हणत भारतीयही इथं पोहोचल्याचं म्हटलं. तिथं चंद्रावर भारतानं पाऊल ठेवलेलं असतानाच इथं देशभरातून उत्साहाची लाट पाहायला मिळाली. एका नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचं म्हणत प्रत्येकानं इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. 

विक्रम लँडरमागोमागच आता त्यानं सोबत नेलेला प्रज्ञान रोवरही चंद्रावर उतरला आहे. 24 ऑगस्ट 2023 ला इस्रोनंच याबाबतची माहिती देत रोवरनं चंद्रावर भ्रमण करण्यास सुरुवात केल्याची माहिती दिली आणि एका क्षणात पुन्हा एकदा चांद्रयान 3 मोहिमेनं आणखी एका यशाला गवसणी घातल्याची नोंद झाली. 

'मेड इन इंडिया, मेड फॉर मून', असं म्हणत इस्रोनं रोवर चंद्रावर उतरल्याचं सांगितलं इतकंच नव्हे तर त्यानं चंद्रावर भ्रमणही सुरु केल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळं आता येत्या काळात हा रोवर नेमकी काय माहिती पुरवतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार असल्याचीच प्रतिक्रिया इस्रोनं दिली. 

हेसुद्धा वाचा : ISRO प्रमुख एस.सोमनाथही इन्स्टाग्रामवर; पण, एकमेव व्यक्तीलाच करतात फॉलो

हेसुद्धा वाचा : Chandrayaan 3 चं रोवर किमया करणार; भारताची राजमुद्रा कायमस्वरुपी चंद्रावर उमटणार

चांद्रयानाच्या लँडर आणि रोवरचं नेमकं काम काय? 

चांद्रयान 3 नं चंद्र गाठला असतानाच आता विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवरचं खरं काम सुरु झालं आहे. विक्रम लँडरनं लँडिंगनंतर चंद्राची पहिलीवहिली झलकही दाखवली . ज्यानंतर आता त्यातून रोवरही बाहेर आला आहे. प्रज्ञान असं या रोवरचं नाव असून, तो सौरउर्जेवर काम करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 6 चाकं असणारं हे रोवर उपकरण प्रती सेकंद 1 सेमी इतक्या वेगानं चंद्रावर भ्रमण करेल. रोवरच्या माध्यामातून चंद्रावरील माहिती लँडरपर्यंत आणि तिथून ती थेट पृथ्वीवर इस्रोपर्यंत पोहोचणार आहे. 

प्रज्ञान रोवरला कसं मिळालं हे नाव? 

बुद्धी आणि विवेर यांना समानार्थी शब्द म्हणून प्रज्ञानचा उल्लेख होतो. चांद्रयानातील रोवरलाही म्हणूनच हे नाव देण्यात आलं असून, त्यामध्ये असणारं तंत्रज्ञान AI शीसुद्धा संबंधित आहे. हा रोवर चंद्रावर Chemical Study करणार आहे.