पेट्रोलसोबत सीएनजी, घरगुती गॅस आणि विमान प्रवासही महागला

 पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीसोबतच आता सीएनजीसह घरगुती गॅसच्या किंमतीतही वाढ 

Updated: Oct 1, 2018, 10:10 AM IST
पेट्रोलसोबत सीएनजी, घरगुती गॅस आणि विमान प्रवासही महागला  title=

मुंबई : केंद्र सरकराने सर्वसामान्यांना वाढत्या महागाईचा जबरदस्त झटका दिलाय. पेट्रोल24 पैशांनी तर डिझेल ३२ पैशांनी महागलंय.. मुंबईत पेट्रोलचा दर 91.08 पैसे प्रति लिटर तर डिझेल 79.72 पैसे इतका झालाय.. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीसोबतच आता सीएनजीसह घरगुती गॅसच्या किंमतीतही वाढ झालीये. याशिवाय विमान प्रवास देखील महागलाय.

कसे आहेत दर ?

केंद्र सरकारनं सीएनजीचा दर प्रती किलो 1.70 रुपयांनी वाढवलाय.. त्यामुळे  सीएनजी प्रती किलोला 46 रुपयांपर्यंत महागलाय.. आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू करण्यात आलीये.. विनाअनुदानित गॅस सिलेंडरचा दर तब्बल 59 रुपयांनी तर अनुदानित सिलिंडरमध्ये 2.89 रुपयांची वाढ केल्यानं सर्वसामान्य ऐन सणासुदीला महागाईत चांगलेच भरडले जाणार आहेत.

विमान प्रवासही महाग 

 विमानाच्या इंधनाचे दरही वाढलेत. आता विमानाचं इंधन 2  हजार 650 रुपये प्रतिकिलो लिटरला विकलं जाणार आहे.. हा दर एटीएफअंतर्गत करण्यात आला आहे, म्हणजेच विमान कंपन्या त्यांच्या तिकिट दरामध्ये वाढ करू शकणार आहेत. त्यामुळे विमान प्रवास महागणार आहे.