Shraddha Murder Case नंतर आफताबचे कुटुंब फरार; त्यांचाही होता वाटा?

आफताबचे कुटुंब पंधरा दिवसांपूर्वी वसईतील आपले घर सोडून मुंबईला आले होते, असे समोर आले आहे. 

Updated: Nov 16, 2022, 03:25 PM IST
Shraddha Murder Case नंतर आफताबचे कुटुंब फरार; त्यांचाही होता वाटा?   title=
shocking details of the Shraddha Walkar murder case sc

Shraddha Murder Case: अवघ्या देशाला हादरावून सोडणाऱ्या दिल्लीतील श्रद्धा हत्याकांड प्रकरणाचे (Shraddha Murder Case) नवीन खुलासे समोर येत आहे. त्यानंतर आता श्रद्धा वालकरला ठार मारून नंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबचे कुटुंब पंधरा दिवसांपूर्वी वसईतील आपले घर सोडून मुंबईला आले होते, असे समोर आले आहे. 

आफताब कुटुंबाच्या शेजाऱ्यांचे धक्कादायक खुलासे

28 वर्षीय आफताब हा श्रद्धासह (Shraddha Murder Case) दिल्लीत राहात होतो. ते दोघेही लिव्ह इनमध्ये राहात होते. पण तो सतत तिला मारहाण करत असे. त्यानंतर तिचा गळा दाबून हत्या केली आणि नंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे करून त्याने वेगवेगळ्या ठिकाणी भिरकावून दिले. पण आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर आफताब कुटुंबाच्या शेजाऱ्यांनी माहिती दिली की, नुकतीच आफताबने आपल्या कुटुंबाला भेट दिली होती तेव्हा तो सर्वसाधारण वाटला. याच वसईच्या घरात अनेकवेळा श्रद्धा आलेली होती आणि शेजारी तिला ओळखत होते. 

आफताबचे कुटुंब हे या इमारतीत 20 वर्षे राहात होते. तो इथेच लहानाचा मोठा झाला. आफताबचे वडील हे मुंबईला कामाला होते. नंतर त्यांनी संपूर्ण कुटुंब मुंबईला हलविण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना सोसायटीतील लोकांनी विचारले, तेव्हा ते म्हणाले की, ते आणि त्यांचा लहान मुलगा मुंबईतच (Mumbai Crime News) काम करत आहेत, त्यामुळे त्यांनी संपूर्ण कुटुंब मुंबईला हलविण्याचा निर्णय घेतला आहे. आफताबचे कुटुंब मुंबईत राहत होते. त्यांनी सांगितले की, आफताब एक सरासरी विद्यार्थी होता. त्याचे कधिही मित्र किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याशी वाद झाला नाही.   

हे ही वाचा : श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबच्या हातावर....; पोलिसांकडून धक्कादायक माहिती समोर

पोलिसांना न सांगता कुटुंबीय स्थलांतरित

तसेच माणिकपूर पोलिसांनी (Manikpur Police) आफताबला वसईत बोलावल्यानंतर त्याचा जबाब घेतल्यानंतर त्याचे कुटुंबीय अज्ञातस्थळी स्थलांतरित झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांना न सांगता कुटुंबीय स्थलांतरित झाले. त्यामुळे आफताबचा हातखंडा घरच्यांना माहीत असावा, असा पोलिसांना संशय आहे. पूनावाला यांना आधी ऑक्टोबरमध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आले होते पण नंतर त्यांना तेथून जाण्यास सांगण्यात आले होते. नंतर 3 नोव्हेंबरला पुन्हा बोलावले. यानंतर मणिपूर पोलीस 8 नोव्हेंबरला दिल्लीला गेले. 

15 दिवसांपूर्वी आफताब कुटुंबाला भेटला

दरम्यान, आफताब आपल्या कुटुंबियांना मुंबईत स्थलांतरित होण्यासाठी मदत करण्यासाठी 15 दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसई येथील रहिवासी सोसायटीत आला होता, अशीही माहिती समोर आली आहे. सोसायटीच्या एका सदस्याने मंगळवारी ही माहिती दिली.

सोसायटीच्या सदस्याने सांगितले की, 'आम्ही येथून जाण्याचे कारण विचारले असता आफताबच्या वडिलांनी आम्हाला सांगितले की, त्यांच्या मुलाला मुंबईत नोकरी लागली आहे आणि त्यांची कंपनी भाडे देईल. त्यांनी (मुंबई आणि वसई दरम्यानच्या प्रवासातील) गैरसोयीचाही उल्लेख केला.