प्रशासन दबले, अखेर प्रियंका गांधी २४ तासांनंतर काही पीडितांना भेटल्या

 प्रशासनाने २४ तासानंतर सोनभद्र घटनेतील पीडितांची प्रियंका गांधी-वाड्रा यांनी भेट घेतली आहे.  

ANI | Updated: Jul 20, 2019, 01:10 PM IST
प्रशासन दबले, अखेर प्रियंका गांधी २४ तासांनंतर काही पीडितांना भेटल्या title=
Pic Courtesy: ANI

मिर्झापूर : प्रशासनाने २४ तासानंतर सोनभद्र घटनेतील पीडितांची प्रियंका गांधी-वाड्रा यांनी भेट घेतली आहे. प्रियंका गांधी या सोनभद्र हत्याकांडानंतर मिर्झापूर येथील पीडीत कुटुंबांची भेट घेण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखत ताब्यात घेतले होते. त्यानंतर प्रियंका यांनी कार्यकर्त्यांसह रस्त्यातच ठाण मांडले. मी पीडितांची भेट घेतल्याशिवाय माघारी परत जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती. दरम्यान, पोलिसांनी १४४ कलमही लागू केले. मात्र, प्रियंका गांधी अधिक आक्रमक झाल्यानंतर प्रशासनाला नमते घ्यावे लागले आहे. प्रशासनाने काही पीडितांसोबत प्रियंका यांची भेट घडवली आहे. यावेळी प्रियंका यांनी प्रियंका गांधी यांनी  'पीडितांना भेटण्यापासून का रोखलं?', प्रशासनाला सवाल विचारला आहे. तर या भेटीनंतर प्रियंका यांनी पुन्हा धरणे आंदोलन सुरु केले आहे.

प्रियंका गांधींचे रात्रभर धरणे, पीडितांना भेटल्याशिवाय जाणार नाही!

उत्तर प्रदेशमधील सोनभद्रमध्ये जमिनिच्या वादातून हिंसाचारात घडवून आणला गेला. या हत्याकांडात १० जणांना ठार करण्यात आले. या हत्याकांडातील पीडितांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी आल्या होत्या. त्यांना रोखत मनाई करण्यात आली. मात्र, त्या मागे हटल्या नाहीत। त्यांचा निर्धार कायम होता. या कारवाईच्या निषेधार्थ प्रियांका यांनी कार्यकर्त्यांसह रस्त्यावरच ठाण मांडून धरणे धरले.

दरम्यान, सोनभद्रमधील हत्याकांडानंतर उत्तर प्रदेशचे राजकारण चांगलेच तापले आहे. हे प्रकरण आणखी चिघळणार याचा अंदाज आल्यानंतर उपजिल्हाधिकारी आणि अन्य चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले. तसेच सरपंच यज्ञ दत्त, त्याचा भाऊ व अन्य २९ जणांना अटक करण्यात आली आहे. आज प्रियंका गांधी यांना प्रशासनाकडून पीडितांची भेट घडवून आणण्यात आली. त्यावेळी प्रियंका अधिक आक्रमक झाल्यात. या पीडीत कुटुंबांना संरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी केली.