'रामायण' मालिकेतील 'राम' अरुण गोविल यांचा भाजपमध्ये प्रवेश

रामयणातील राम भाजपमध्ये...

Updated: Mar 18, 2021, 06:06 PM IST
'रामायण' मालिकेतील 'राम' अरुण गोविल यांचा भाजपमध्ये प्रवेश title=

नवी दिल्ली : ‘रामायण’ या मालिकेतून प्रसिद्ध झालेले अभिनेता अरुण गोविल यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. रामानंद सागर यांची मालिका 'रामायण' (Ramayan) मध्ये त्यांनी भगवान राम (Ram) यांची भूमिका साकारली होती. अरुण गोविल (Arun Govil) यांनी भाजप कार्यालयात प्रवेश केला. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह उपस्थित होते. (Actor Arun Govil joins Bharatiya Janata Party)

भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर अरुण गोविल म्हणाले की, 'यावेळी जे आपले कर्तव्य आहे ते केले पाहिजे. आधीचे राजकारण मला समजले नाही, परंतु मोदीजींनी जेव्हापासून देश सांभाळला आहे तेव्हापासून देशाची व्याख्या बदलली आहे. मी मनापासून आणि बुद्धीला जे पटतं ते करतो.'

अरुण गोविल म्हणाले की, आता मला देशासाठी योगदान द्यावे असे मला वाटते आणि त्यासाठी आम्हाला व्यासपीठाची आवश्यकता आहे. आज भाजपा हे एक उत्तम व्यासपीठ आहे. ते म्हणाले की, मी पाहिले की ममता बॅनर्जी यांना "जय श्री राम" या घोषणेची एलर्जी आहे. 'जय श्री राम' ही फक्त घोषणा नाही.

अरुण गोविल यांचा भाजपमधील प्रवेश 5 राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विशेष मानला जात आहे. मात्र, पक्षात अरुण गोविल यांना काय जबाबदारी असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गोविल हेदेखील भाजपचे सदस्यत्व घेतल्यानंतर विधानसभा निवडणूक लढवू शकतात, असा अंदाज वर्तविला जात आहे. पक्षाकडून किंवा गोविल यांच्याकडून याबाबत कोणतेही विधान अजून झालेले नाही.

अरुण गोविल यांच्या आधी 'रामायण' या मालिकेतील इतर कलाकारांनीही राजकारणात प्रवेश केला आहे. रामायणात 'सीता'ची भूमिका साकारणारी दीपिका चिखलिया, 'हनुमान' साकारणारे दारा सिंह आणि 'रावण' साकारणारे अरविंद त्रिवेदी यांनीही राजकारणात प्रवेश केला आहे. दीपिका चिखलिया यांनीही दोन वेळा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली आहे.