महिला रस्त्याच्या मधोमध थांबली, पुढं जावं की मागं कळेना, तेवढ्या भरधाव आली दुचाकी अन्...

Viral Video: रस्त्यावरची छोटीशी निष्काळजीपणा तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेसा असतं. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय...

Updated: Nov 3, 2022, 12:27 AM IST
महिला रस्त्याच्या मधोमध थांबली, पुढं जावं की मागं कळेना, तेवढ्या भरधाव आली दुचाकी अन्... title=
Accident video of the woman try to cross Road

Accident Video : सोशल मीडियावर भयानक, विचित्र आणि थरारक अपघाताचे अनेकदा व्हिडीओमधून आपण पाहिले आहेत. हे व्हिडीओ पाहून हृदयाचे ठोके चुकतात. रस्ते अपघात होण्यामागे अनेक वेळा गाडी चालकाची चुकी असते असं नाही. रस्ते अपघातात (Road Accident) अनेक लोकांचे जीव गेले आहेत. तर कधी कधी भयानक रस्ते अपघातात कोणाला साधं खरचटत देखील नाही.

रस्त्यावर नेहमी सावध राहणं आणि सावध राहणं खूप महत्वाचं आहे, अन्यथा एक छोटीशी चूक तुमचा जीव घेऊ शकते. सोशल मीडियावर अनेक अपघातांचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. मात्र हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आलाय तर कोणाकोणाला (Accident video of the woman) महिलेचं कृत्य पाहून हसू आवरता आलं नाही.

आणखी वाचा -आनंदाच्या भरात वाघाखाली येऊन झोपली महिला, त्यानंतर जे काही झालं... पाहा Video

एक पिवळा ड्रेस घातलेली महिला (Women try to cross Road) रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी ती महिला रस्त्याच्या मधोमध थांबली. त्यावेळी दुसऱ्या बाजूने भरधाव दुचाकी आली. त्यामुळे पुढं जावं की मागं कळेना, त्यावेळी दुचाकी चालकाने गाडीची स्पिड कमी केली नाही. त्यामुळे लेफ्ट राईट लेफ्ट राईट करत गाडी थेट महिलेला धडकली.

पाहा व्हिडीओ- 

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म ट्विटरवर (Twitter) शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 6 सेकंदांचा हा व्हिडिओ (Viral Video) लाखो वेळा पाहिला गेला आहे. अचानक गाडी आल्याने महिलेला काय करावं सुचेना आणि त्यावेळी हा अपघात घडला.