पाटणा : Crime News :तीन वर्षांच्या निष्पाप नातीसोबत आजोबाने गैरवर्तन केल्याची धक्कादाक आणि लाज आणणारी घटना समोर आली आहे. गैरवर्तनानंतर चिमुरडी बेशुद्धावस्थेत आढळली. तीन वर्षांची नात आजोच्या शेजारी झोपली होती. बुधवारी रात्री आजोबाने नातीसोबत गैरवर्तन केले. सकाळी मुलगी न दिसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरु केला. त्यावेळी कुटुंबीयांना मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. त्यानंतर ही बाब समोर आली.
आजोबाच्या नात्याला तडा गेल्याची घटना बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यात समोर आली आहे. गमहरिया पोलीस स्टेशन हद्दीतील पिपराही गावात आजोबाने एका निष्पाप नातीवासोबत गैरवर्तन केले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपी आजोबाला पोलिसांनी अटक केली आहे. गमहरिया पोलीस स्टेशन हद्दीतील पिपराही गावात बुधवारी रात्री तीन वर्षांची नात आजोबांच्या शेजारी झोपली होती. त्यानंतर नातीसोबत गैरवर्तन केले.
दरम्यान, गावातील लोकांनी बांसबाड़ीत ही चिमुरडी बेशुद्ध अवस्थेत पाहिली. आरडाओरडा केल्याने आलेल्या कुटुंबीयांनी मुलीला उपचारासाठी गमहरिया येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. धक्कादायक म्हणजे आरोग्यकेंद्रात डॉक्टरांनी पोलीस केस असल्याचे सांगून उपचार करण्यास नकार दिला.
त्यानंतर कुटुंबीयांनी मुलीवर उपचारासाठी मेडिकल कॉलेज आणि सदर हॉस्पिटल गाठले. तेथेही पोलिसांचा हवाला देत मुलीवर उपचार करण्यास नकार देण्यात आला. यानंतर कुटुंबीयांनी सदर पोलीस ठाणे गाठले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती एसपी राजेश कुमार यांना देण्यात आली. पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेवरून तपास सुरु करण्यात आला आहे.
दरम्यान, या मुलीवर सदर रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोलीस अधीक्षक अजय नारायण यादव यांनी गावात जाऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. मुलीची चौकशी केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाली. पोलीस अधीक्षक अजय नारायण यादव यांनी सांगितले की, मुलीच्या जबावावरुन तिचे आजोबा छोटेलाल ऋषीदेव यांना अटक करण्यात आली आहे. आता मुलीची तब्बेत ठिक आहे, अशी त्यांनी माहिती दिली.