तुमचा EPF 66 टक्के वाढणार! करोडपती होत निवृत्त व्हाल, जाणून घ्या सरकारचा नवा नियम

New Wage Code/ Provident Fund: नवीन वेतनश्रेणी नियमांची  (The New Wage Code) चर्चा सध्या जोरात आहे.  

Updated: Jan 11, 2022, 10:46 AM IST
तुमचा EPF 66 टक्के वाढणार! करोडपती होत निवृत्त व्हाल, जाणून घ्या सरकारचा नवा नियम title=

मुंबई : New Wage Code/ Provident Fund: नवीन वेतनश्रेणी नियमांची  (The New Wage Code)चर्चा सध्या जोरात आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये याबद्दल बरेच काही लिहिले आणि सांगितले गेले आहे, परंतु केंद्र सरकारकडून अद्याप याबद्दल कोणतीही औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही. तथापि, सर्वात मोठी गोष्ट ही आहे की, नवीन वेतन संहिता  (New Wage Code Update)जेव्हा लागू होईल, तेव्हा खासगी क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी दिलासा देणारी बाब ठरणार आहे.

New Wage Codeचा मोठा दिलासा

New Wage Codeमध्ये असे म्हटले आहे की, कर्मचार्‍याचे मूळ वेतन त्याच्या CTCच्या 50 टक्क्यांपेक्षा कमी नसेल. याचा परिणाम कर्मचाऱ्याच्या EPF  (Employees Provident Fund) रकमेवरही होईल. कर्मचारी आणि कंपनी दर महिन्याला मूळ वेतनाच्या 12-12 टक्के रक्कम पीएफमध्ये जमा करतील.

EPFO नियम काय म्हणतो?

ईपीएफओच्या  (Employees Provident Fund)  नियमांनुसार, जर तुम्ही पीएफची संपूर्ण रक्कम काढली तर त्यावर कर आकारला जात नाही. त्यामुळे, नवीन वेतन संहिता लागू झाल्यानंतर, जेव्हा मूळ वेतन 50 टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि त्यावर पीएफ योगदान कापले जाईल, तेव्हा पीएफ निधी देखील अधिक असेल. म्हणजेच कर्मचारी निवृत्त झाल्यावर त्याच्याकडे पूर्वीपेक्षा जास्त पीएफ शिल्लक असेल.  

समजा तुम्ही 35 वर्षांचे आहात आणि तुमचा पगार दरमहा 60,000 रुपये आहे. या प्रकरणात, जर तुमची वार्षिक 10 टक्के वाढ गृहीत धरली तर, वर्तमान पीएफचा 8.5 टक्के व्याज दर निवृत्तीच्या वयापर्यंत म्हणजेच 25 वर्षांनंतर, तुमची एकूण पीएफ शिल्लक 1,16,23,849 रुपये होईल.

लक्षाधीश म्हणून निवृत्त

त्याचवेळी, सध्याच्या EPF योगदानाशी त्याच्या PF शिल्लकची तुलना केल्यास, सेवानिवृत्तीनंतर PF शिल्लक रक्कम 69,74,309 रुपये आहे. म्हणजेच, नवीन वेतन नियमानुसार, पीएफ शिल्लक जुन्या निधीपेक्षा किमान 66 टक्के जास्त असेल. म्हणजेच नवीन वेतनसंहिता लागू झाल्यास तुम्ही करोडपती म्हणून निवृत्त व्हाल.

ग्रॅच्युइटी देखील बदलेल

नवीन वेतन संहितेनुसार  (The New Wage Code) कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीत बदल होणार आहे. ग्रॅच्युइटीची गणना आता मोठ्या आधारावर केली जाईल, ज्यामध्ये मूळ वेतन तसेच प्रवास, विशेष भत्ता इत्यादींचा समावेश आहे. हे सर्व कंपनीच्या ग्रॅच्युइटी खात्यात जमा केले जाणार आहे.