नवी दिल्ली : नवीन बँक खातं उघडण्यासाठी आणि बँकांमध्ये ५० हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्तचे व्यवहार करण्यासाठी आधार कार्ड नंबर बंधनकारक करण्यात आला आहे. याचबरोबर बँकेत खात असणाऱ्या सगळ्या खातेदारकांना ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत आधार कार्डचा नंबर बँकेत द्यावा लागणार आहे. बँकेमध्ये आधार कार्ड नंबर दिला नाही तर अशी खाती बंद करण्यात येणार आहेत.
आयकर परतावा भरण्यासाठी एक जुलैपासून आधार बंधनकारक करण्यात आलंय. सुप्रीम कोर्टाकडून केंद्र सरकारचा आधार सक्तीचा निर्णय रद्द ठरवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी केंद्रीय थेट कर मंडळ अर्थात सीबीडीटीकडून महत्त्वपूर्ण निर्देश जारी करण्यात आले. त्यानुसार आयकर भरताना आधार कार्ड सादर करणे सक्तीचे असेल.
याशिवाय नवीन पॅनकार्ड मिळवण्यासाठीही आधार कार्ड आता आवश्यक असेल. एक जुलै रोजी ज्यांना पॅनकार्ड आणि आधार क्रमांक मिळेल त्यांनी पॅनकार्ड आधारकार्डाच्या जोडणीसाठी आयटी अधिका-यांकडे द्यावा असं सीबीडीटीनं स्पष्ट केलंय.