आता आधार कार्ड शिवाय नाही करता येणार या ७ गोष्टी

जर तुम्ही अजुनही आधार कार्ड बनवलं नसेल तर ते लवकरच करुन घ्या. कारण मोदी सरकार आता अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आधार नंबर अनिवार्य करणार आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 1, 2017, 05:14 PM IST
आता आधार कार्ड शिवाय नाही करता येणार या ७ गोष्टी title=

नवी दिल्ली : जर तुम्ही अजुनही आधार कार्ड बनवलं नसेल तर ते लवकरच करुन घ्या. कारण मोदी सरकार आता अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आधार नंबर अनिवार्य करणार आहे.

७ गोष्टींसाठी आधार अनिवार्य

तुमच्याकडे जर आधारकार्ड नसेल तर या ७ महत्त्वाच्या गोष्टींसाठी तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. 

1: आता आधार कॉर्ड शिवाय तुम्हाला मोबाईल सिम मिळणार नाही. प्रत्येकाने त्यांच्या मोबाईल नंबर आधारसोबत जोडणे अनिवार्य आहे.

2: जर तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधारसोबत जोडलं नसेल तर तुमचं पॅनकार्ड रद्द होणार आहे. 

3: रेशनकार्डला जर तुम्ही आधारकार्ड सोबत जोडलं नाही तर तुम्हाला सबसिडी नाही मिळणार.

4: बँक खातं आधारशी जोडणे आवश्यक आहे, अन्यथा तुमचे खाते बंद होईल.

5: जर विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती हवी असेल तर त्याला आधारची माहिती द्यावी लागेल.

6: तुम्हाला जर पासपोर्ट काढायचं असेल आणि तुमच्याकडे आधारकार्ड नसेल तर तुम्हाला पासपोर्ट काढता येणार नाही.

7: आयकर भरण्यासाठी तुम्हाला आधारनंबर आवश्यक असणार आहे. त्याशिवाय तुम्हाला ते भरता येणार नाही.