नवी दिल्ली : कोणत्याही कामासाठी आधार कार्ड क्रमांक (Aadhaar)अतिशय महत्त्वाचं ओळखपत्र आहे. सरकारकडून आधार कार्डमध्ये काही चूक झाल्यास त्यात दुरुस्ती करण्याचाही पर्याय देण्यात आला आहे. घर, शहर बदलल्यास आधार कार्ड अपडेट करणं आवश्यक आहे. आधारकार्ड अपडेट करण्यासाठी काही वेळा कागदपत्रांची गरज असते. तर काही वेळा कागदपत्रांशिवायही आधार कार्ड अपडेट करता येतं.
आधारकार्डमध्ये फोटो, फिंगर प्रिंट, स्कॅन, लिंग, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अपडेट करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कागदपत्र देण्याची गरज नाही. हे सर्व बदल करण्यासाठी आधार कार्ड कॉपी घेऊन जवळच्या आधार केंद्रात वेळ घ्यावी लागते. आणि आपल्या गरजेनुसार, आधारमध्ये बदल करता येतात.
आधार कार्डमधील नाव, पत्ता, जन्मतारीख अपडेट करण्यासाठी कागदपत्रांची गरज असते.
जन्म प्रमाणपत्र, पॅनकार्ड, पासपोर्ट, लेटर हेडवर ग्रुप-ए ऑफिसरकडून प्रमाणित जन्म तारिख, केंद्र सरकारची आरोग्य सेवा योजना फोटो कार्ड किंवा माजी सैनिक फोटो आयडी लेटरहेड, १०वी किंवा १२वी सर्टिफिकेट, फोटो आयडी, वोटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारी ओळखपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र यापैकी कोणतेही कागदपत्र आवश्यक आहेत.
आधारमध्ये डेमोग्राफिक दुरुस्तीसाठी ५० रुपये + जीएसटी आणि आधार सर्चसाठी (ई-केवायसी, कलर प्रिंट) ३० रुपये + जीएसटी आकारला जाईल. परंतु नवीन आधार कार्ड मोफत बनवण्याची सोय आहे.