मुंबई: सरकारने ठरवून दिलेल्या मुदतीत आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याचे राहून गेले असेल तर घाबरू नका. तुम्हाला आणखी एक संधी मिळाली आहे. सरकारने पॅनकार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची मुदत आणखी वाढवली आहे. ही मुदत आता ३१ मार्च २०१९ पर्यंत वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत ३३ कोटींपैकी१६.८५ कोटी पॅन कार्ड हे आधारशी सलग्न करण्यात आले आहे. अखेरची मुदत आहे असे घोषित केल्यावर अपडेट करताना वेबसाईट काही ठिकाणी क्रॅश झाल्याचेही प्रकार काल घडले होते. दरम्यान, केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाकडून या पूर्वी चार वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. मुदतवाढीची आताची पाचवी वेळ आहे.
आयकर विभागाच्या वेबसाईवर जाऊन किंवा एसएमएसद्वारे तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक करु शकता.
ही लिंक ओपन केल्यानंतर आलेला फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे. तुमचा पॅन कार्डनंबर हाच तुमचा आयडी असतो. हा फॉर्म भरल्यानंतर तुमच्या मोबाईल आणि मेल आयडीवर ओटीपी(वन टाईम पासवर्ड) येईल. हा ओटीपी नंबर टाकल्यानंतर तुमचं पॅन आणि आधार कार्ड लिंक होईल.