'आधार कार्ड' ड्रायव्हिंग लायसन्ससाठी मस्ट!

तुमच्याकडे 'आधार कार्ड' नसेल तर जरुर काढून घ्या. अन्यथा तुम्हाला गाडी चालवता येणार नाही. लवकरच 'आधार कार्ड' आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी मस्ट राहणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 9, 2018, 12:27 PM IST
'आधार कार्ड' ड्रायव्हिंग लायसन्ससाठी मस्ट! title=

नवी दिल्ली : तुमच्याकडे 'आधार कार्ड' नसेल तर जरुर काढून घ्या. अन्यथा तुम्हाला गाडी चालवता येणार नाही. लवकरच 'आधार कार्ड' आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी मस्ट राहणार आहे.

बोगस ड्रायव्हिंग लायसन्सला चाप

पॅनकार्ड आणि मोबाईल नंबरपाठोपाठ आता ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजेच वाहनचालक परवाना  'आधार कार्ड'शी जोडण्याचे संकेत देण्यात आले आहेत. बनावट ड्रायव्हिंग लायसन्सचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी  'आधार कार्ड'शी ड्रायव्हिंग लायसन्स लिंक करण्यात येणार आहे.

नितीन गडकरींशी चर्चा

 वाहन परवान्यासाठी  'आधार कार्ड'ला जोडण्याची तयारी केंद्र सरकारने सुरु केली आहे. त्यासाठी एक सॉफ्टवेअर बनविण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी केंद्रीय रस्ते आणि काहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा केल्याचेही रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले. 'आधार कार्ड' ही व्यक्तीची वैयक्तिक नव्हे, तर डिजिटल ओळख आहे, असे रवीशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले. 

 सारथी ४ हे सॉफ्टवेअर

देशातील सर्व राज्यांतील ड्रायव्हिंग लायसन्स  'आधार कार्ड'शी लिंक करण्यासाठी नॅशनल इर्न्फोरमेशन सेंटरने (एनआयसी) सारथी ४ हे सॉफ्टवेअर तयार केले आहे. या सॉफ्टवेअरद्वारे सर्व लायसन्स आधारशी लिंक होणार आहे.  

विमा पॉलिसीसाठीही आधार 

एलआयसीची कोणतीही नवी पॉलिसी घेण्यासाठी तसेच विम्याची रक्कम काढण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. नवीन पॉलिसी वाढविण्यासाठी तसेच पॉलिसीच्या ऑनलाइन व्यवहारांसाठी आधार कार्डाची गरज लागणार आहे.