Fertility Clinic Fine: विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे IVF तसच सरोगसीद्वारे मुल जन्माला घालणं सहज शक्य झाले आहे. दिल्लीतील एका जोडप्याने असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी ( ART) तंत्रज्ञाच्या मदतीने पालक होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जुळ्या मुलांनी जन्म दिला. मात्र, फर्टिलिटी क्लिनिकच्या चुकीमुळे पालक होवून देखील त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. फर्टिलिटी क्लिनिकच्या चुकीमुळे महिलेने पती नाही तर दुसऱ्या पुरुषाचे स्पर्म वापरुन जुळ्या बाळांना जन्म दिला. या प्रकरणात महिलेने ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे (consumer court) धाव घेतली होती. निकालाअंती कोर्टाने फर्टिलिटी क्लिनिकला तक्रारदार जोडप्याला 1.5 कोटींची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
दिल्लीतील जोडप्याला पालकत्वाचा अत्यंत विचित्र अनुभव आला आहे. 16 जून रोजी या प्रकरणी आपला निकाल दिला. या महिलेवर पश्चिम दिल्लीतील भाटिया ग्लोबल हॉस्पिटल आणि एंडोसर्जरी इन्स्टिट्यूटमध्ये उपचार सुरू होते. याथे या महिलेला एआरटीद्वारे गर्भवती करण्यात आले. एआरटीच्या माध्यमातून गर्भवती झालेल्या महिलेने 2009 मध्ये दोन जुळ्या मुलींना जन्म दिला.
एआरटी प्रक्रिया म्हणजे 'इंट्रा-साइटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन (ICSI) गर्भधारणा ही IVF तंत्रज्ञासारखीच आहे . ICSI अंतर्गत, पतीच्या शुक्राणूचा वापर महिलेला गर्भधारणा करण्यासाठी केला जातो. मात्र, या महिलेले जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर रक्तगटावरुन महिलेला पती बाळांचे जैविक पिता नसल्याचे उघड झाले. एका बाळाचा रक्तगट AB(+) आहे. यामुळे या जोडप्याला मोठा धक्का बसला. कारण, पालकांचा रक्तगट B (+) आणि O- होता. यानंतर, या जोडप्याने 'सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB), हैदराबाद' येथे डीएनए प्रोफाइल चाचणी केली. यावेळी महिलेचे पती जुळ्या मुलींचा जैविक पिता नसल्याचे उघड झाले.
फर्टिलिटी क्लिनिकच्या चुकीमुळे निष्काळजीपणामुळे या जोडप्याला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. महिलेचे पती जुळ्या मुलींचा जैविक पिता नसल्याचे उघड झाले. यानंतर त्यांनी फर्टिलिटी क्लिनिकविरोधात consumer court धाव घेतली. पालकांनी गेल्या 14 वर्षांपासून मुलींचे संगोपन केले आणि त्यांच्या शिक्षणावर खर्च केला. यानंतर consumer court फर्टिलिटी क्लिनिकला तक्रारदार जोडप्याला 1.5 कोटींची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिलेत.