अजब कर्मचारी, १३ वर्षात एकही सुट्टी नाही, अॅवॉर्ड घ्यायलाही दिला नकार

या पठ्ठ्याने नोकरीला लागल्यापासून गेली १३ वर्षे एकही सुट्टी घेतली नाही.

Updated: Jun 25, 2018, 12:22 PM IST
अजब कर्मचारी, १३ वर्षात एकही सुट्टी नाही, अॅवॉर्ड घ्यायलाही दिला नकार  title=

शिमला: काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये सुट्टीच्या दिवशी कामावर येऊन वर्षभर रुबाब झाडणाऱ्या मंडळींची आपल्याकडे काहीच कमी नसते. असे अनेक लोक आपल्य पाहण्यात असतील. पण, एकही सुट्टी न घेता वर्षानुवर्षे काम करणारे किती लोक आपल्याला माहित आहेत? बुहतेक असे लोक नसतीलच. पण, हिमाचल प्रदेशातील रोडवेज कंपनीत काम करणारा एक कर्मचारी असा आहे. या पठ्ठ्याने नोकरीला लागल्यापासून गेली १३ वर्षे एकही सुट्टी घेतली नाही. हिमाचल राज्य परिवहन मंडळात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्याचे नाव आहे जोगिंदर सिंह (जोगी).

दररोज ऑन ड्यूटी

विशेष असे की, जोगिंदर सिंह केवळ साप्ताहिक सुट्टीच नव्हे तर, सण, उत्सवांसाठी मिळणारी सुट्टीही घेत नाहीत. प्रतिदिन ते ऑन ड्यूटीच असतात. त्यामुळे जोगिंदर यांच्या खात्यावर केवळ साप्ताहिक मिळणाऱ्या ३०३ सुट्ट्या जमा आहेत. ज्या त्यांनी कंपनीला दान रूपात दिल्या आहेत. जोगींच्या या कार्याबद्दल रोडवेजन कंपनीने २०११ मध्ये त्यांना विशेष सन्मानित केले होते.

पुरस्कार स्विकारायलाही सुट्टी नाही

प्राप्त माहितीनुसार, हिमालचल प्रदेशातील सिरमौर कला संगम नावाच्या एका संस्थेने जोगिंदर सिंह यांना त्यांच्या या अनोख्या कार्याबद्धल पुरस्कार देऊन सन्मानित केले. पण, हा पुरस्कार स्विकारण्यासाठीही ते उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्या वतीने त्यांच्या वडिलांनी हा पुरस्कार स्विकारला.