7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात पुन्हा भरघोस वाढ; नवीन वर्षात मिळणार खुशखबर

नवीन वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा आनंद घेऊन येऊ शकतो. जानेवारी 2022 मध्ये पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढणार आहे

Updated: Dec 6, 2021, 02:06 PM IST
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात पुन्हा भरघोस वाढ; नवीन वर्षात मिळणार खुशखबर title=

मुंबई :  नवीन वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा आनंद घेऊन येऊ शकतो. जानेवारी 2022 मध्ये पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढणार आहे. वास्तविक, नवीन वर्षात पुन्हा एकदा डीएमध्ये वाढ होऊ शकते, त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार पुन्हा वाढणार आहेत. (7th Pay Commission)

तथापि, जानेवारी 2022 मध्ये महागाई भत्ता (DA Hike) किती वाढवला जाईल याचा निर्णय झालेला नाही. परंतु, AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, 3% DA वाढण्याची अपेक्षा आहे.

नोकरदारांना नवीन वर्षात आनंदाची बातमी 

डिसेंबर 2021 अखेरीस केंद्राच्या काही विभागांमध्ये पदोन्नती होणार आहे. याशिवाय, 2022 च्या अर्थसंकल्पापूर्वी फिटमेंट फॅक्टरबद्दल देखील चर्चा आहे, ज्यावर निर्णय येऊ शकतो.

DA AICPI डेटाद्वारे निश्चिती

तज्ज्ञांच्या मते, जानेवारी 2022 मध्येही महागाई भत्ता 3% ने वाढवला जाऊ शकतो. म्हणजेच, जर 3% वाढ झाली तर एकूण DA 31% वरून 34% पर्यंत वाढू शकतो. AICPI डेटानुसार, सप्टेंबर 2021 पर्यंतची आकडेवारी आता समोर आली आहे.

AICPI डेटानुसार, सप्टेंबर 2021 पर्यंतची आकडेवारी आता बाहेर आली आहे. त्यानुसार, महागाई भत्ता (DA) 32.81 टक्के आहे. जून 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, जुलै 2021 च्या महागाई भत्त्यात 31 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. 

म्हणजेच, आता त्याच्या पुढील आकडेवारीनुसार, महागाई भत्ता मोजला जाईल आणि त्यात चांगली वाढ दिसून येईल.

DA मध्ये 3 टक्क्यांनी वाढ

जर आपण AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, सप्टेंबर 2021 पर्यंत, महागाई भत्ता 33 टक्क्यांवर गेला आहे.

म्हणजेच त्यात 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरची आकडेवारी अद्याप उपलब्ध झालेली नाही.

हेही वाचा : PM Kisan | खुशखबर! या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे; यादीत तुमचे नाव आहे का? असं करा चेक

त्यात आणखी 1 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. 

डिसेंबर 2021 पर्यंत CPI (IW) चा आकडा 125 पर्यंत राहिला, तर महागाई भत्त्यात 3 टक्कांनी वाढ निश्चित आहे. म्हणजेच एकूण DA 3% ते 34% वाढेल. 

जानेवारी 2022 पासून ते दिले जाणार असून केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार आहेत.

34% DA वर गणना

महागाई भत्ता 3% ने वाढवल्यानंतर एकूण DA 34% होईल. आता 18,000 रुपयांच्या मूळ पगारावर एकूण वार्षिक महागाई भत्ता 73,440 रुपये असेल.

 पण फरकाबद्दल बोलायचे झाले तर पगारात वार्षिक 6480 रुपये वाढ होणार आहे.