7th pay commission: १२वी पास विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी

सरकारी नोकरीची संधी...

Updated: Feb 10, 2020, 03:08 PM IST
7th pay commission: १२वी पास विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी  title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : १२वी पास विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीसाठी संधी उपलब्ध आहे. डायरेक्टोरेट जनरल, सीआरपीएफ, गृह मंत्रालय, भारत सरकारने (CRPF Head Constable Recruitment 2020) अनेक पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध केली आहे. या सर्व व्हॅकेंसी सातव्या वेतन आयोगाअंतर्गत काढण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ७ फेब्रुवारीपासून सुरु करण्यात आली आहे. या पदांसाठी योग्य उमेदवार ५ मार्च २०२० पर्यंत अर्ज करु शकतात.

पुरुष आणि महिला दोघांसाठी ही भरती सुरु करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही पदं आता तात्पुरती आहेत. परंतु नंतर, सरकारने ठरविलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पदं कायमस्वरूपी केली जाऊ शकते. लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटेटिव्ह एग्झामिनेशनच्या (LDCE) माध्यमातून या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.  

- ७ फेब्रुवारीपासून यासाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे
- या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ मार्च २०२०
- लेखी परिक्षेची तारीख १९ एप्रिल २०२०

पदांची संख्या -

लिंग जनरल एससी एसटी एकूण
पुरुष १०३१    २००  १००  १३३१
महिला ६३     १२    ६    ८१
एकूण  १०९४   २१२   १०६   १४१२

वेतन -

या भरतीसाठी योग्य असलेल्या उमेदवाराला सातव्या वेतन आयोगाच्या मॅट्रिक्स लेवल-४ अंतर्गत वेतन देण्यात येणार आहे. म्हणजेच उमेदवारांना प्रत्येक महिन्याला २५,००० रुपयांपासून ते ८११०० रुपयांपर्यंत वेतन असू शकतं. 

पात्रता -

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही बोर्डमधून १२वी पास असल्याचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे.

वयोमर्यादा -

उमेदवारासाठी अधिकाधिक वयोमर्यादा ३२ वर्षांपर्यंत आहे. १ ऑगस्ट २०१९च्या आधारे उमेदवाराच्या वयाची गणना केली जाणार आहे.

या भरतीबाबत अधिक माहितीसाठी, अधिकृत वेबसाईटवर  https://www.crpf.gov.in/recruitment-details.htm?189/AdvertiseDetail माहिती घेता येऊ शकते. याशिवाय अधिकृत नोटिफिकेशनसाठी https://www.crpf.gov.in/writereaddata/Portal/Recruitment_Advertise/ADVER... या लिंकवर क्लिक करुन भरतीबाबत माहिती मिळू शकते.