7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांठी गूड न्यूज, झटक्यात वाढणार इतका पगार

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employee) आणखी एक गूड न्यूज आहे.   

Updated: Aug 27, 2021, 04:40 PM IST
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांठी गूड न्यूज, झटक्यात वाढणार इतका पगार title=

मुंबई : केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (Dearness allowance) आणि निवृत्तीवेतन धारकाना  (Dearness Relief) 1 जुलैपासून 28 टक्के रक्कम मिळण्यास सुरुवात झाली. केंद्र सरकारने महागाई भत्ता 17 टक्क्यावरुन 28 टक्के इतका केला. त्यानंतर आता कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक गूड न्यूज आहे. कर्मचाऱ्यांना फेस्टीव्हल सिझनमध्ये 3 टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवून मिळण्याची आशा आहे. ही वाढ झाली तर एकूण महागाई भत्ता हा 31 टक्के होईल. (7th Pay Commission Central employees are going to get Festival Gift salary will increase with one stroke)

महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ होणार... 

सरकारने महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करणार असल्याची घोषणा करावी, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना  फेस्टीव्ह सिझनमध्ये काहीसा दिलासा मिळेल, अशी मागणी कर्मचारी संघटनेने केलेली आहे.  AICPI इंडेक्सची आकडेवारी आलेली आहे. इंडेक्स 121.7 वर पोहचला आहे. त्यामुळे जून 2021 च्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ होणार असल्याचं  जवळपास निश्चित आहे. जून 2021च्या इंडेक्समध्ये 1.1 ने वाढ झाली आहे. त्यामुळे ही आकडेवारी 121.7 इतकी झाली आहे. 

महागाई भत्ता 31 % होणार..

या हिशोबाने महागाई भत्ता हा 31.18 टक्के इतका होईल. DA ची गणना ही राऊंड फिगरनुसार होते. त्यामुळे DA 31 टक्के इतका होईल. जून महिन्यातील महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा ही सप्टेंबरपर्यंत होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच ही जून महिन्याची थकबाकी सप्टेंबर महिन्यातील वेतनात मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.  

पगारात किती वाढ होणार?

जूनमधील महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ झाल्यास एकूण DA हा 31 टक्के होईल. सातव्या वेतन आयोगाच्या मेट्रिक्स नुसार (7th Pay Commission), केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या प्रथम श्रेणी (Level 1) कर्मचाऱ्यांचं वेतन हे 18 हजार ते 56 हजार 900 रुपयांदरम्यान आहे. आता 18 हजार रुपये बेसिक सॅलरीवर 28 टक्क्यांच्या हिशोबाने मासिक महागाई भत्ता हा 5 हजार 40 रुपये इतका होता. तर महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ होऊन 31 टक्के झाल्यावर महागाई भत्ता हा 5 हजार 580 रुपये इतका होईल. या हिशोबाने वार्षिक वेतनात एकूण 6 हजार 480 रुपयांनी वाढ होईल.   

किती वाढणार पगार? 

1. कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी                     18 हजार रुपये
2. नवीन महागाई भत्ता (31%)                    5 हजार 580 रुपये दरमहा
3. आताचा महागाई भत्ता (28%)                5 हजार 40 रुपये दरमहा
4. महागाई भत्तात किती वाढ                       5580-5040 = 540 रुपये दरमहा
5. वार्षिक वेतनात होणारा फायदा                 540X12= 6480 रुपये

56 हजार 900 रुपये बेसिक सॅलरी असलेल्या कर्मचाऱ्यांना किती फायदा? 

31% DA च्या हिशोबानुसार... 

1. कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी                    56 हजार 900 रुपये
2. नवीन महागाई भत्ता (31%)                   17 हजार 639 रुपये दरमहा
3. आतापर्यंतचा महागाई भत्ता (28%)        15 हजार 932 रुपये दरमहा
4. महागाई भत्त्यात किती वाढ                    17 हजार 639-15 हजार 932 = 1 हजार 707 रुपये दरमहा 
5. वार्षिक वेतनात किती वाढ?                   1 हजार 707X12=  20 हजार 484 रुपये

म्हणजेच एकूण वार्षित वेतनात 20 हजार 484 रुपयांचा फायदा होईल. यामध्ये HRA चा समावेश नाही. अंतिम वेतनात (Home Salary)  HRA चा समावेश केल्यानंतरच पुढचा आकडा समजेल.