Republic Day : राष्ट्रपतींच्या हस्ते राजपथावर ध्वजारोहण सोहळा संपन्न

७१वा प्रजासत्ताकदिन...

Updated: Jan 26, 2020, 12:43 PM IST
Republic Day : राष्ट्रपतींच्या हस्ते राजपथावर ध्वजारोहण सोहळा संपन्न title=
फोटो सौजन्य : ANI/ Doordarshan

नवी दिल्ली : देश आज ७१वा प्रजासत्ताकदिन साजरा करतोय. नवी दिल्लीतील राजपथावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. ब्राझीलचे राष्ट्रपती बोल्सोनारो हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी २१ तोफांच्या सलामीसह तिरंग्याला सलामी दिली.

७१व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील राजपथावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त संचलनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडिया गेटजवळील राष्ट्रीय युदध स्मारक येथे शहीदांना श्रद्धांजली वहिली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण प्रमुख बिपिन रावत यांच्यासह तीनही सेना दलांचे प्रमुख उपस्थित होते.