कर्नाटकात 5 वाजेपर्यंत 64 टक्के मतदान

कर्नाटकातलं मतदान संपलं

Updated: May 12, 2018, 06:29 PM IST
कर्नाटकात 5 वाजेपर्यंत 64 टक्के मतदान title=

बंगळुरु : कर्नाटकमध्ये आज विधानसभेच्या 222 जागांसाठी मतदान झालं. कर्नाटकच्या निवडणुकीवर संपूर्ण देशांचं लक्ष लागलं आहे. कर्नाटकचा निकाल हा 2019 मधील मोदी सरकारचं भवितव्य ठरवणार आहे. 15 मे कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. एका सीटवर एका उमेदवाराच्या मृत्यूमुळे मतदान नाही झालं तर  राजराजेश्वरीनगर मध्ये एका फ्लॅटमध्ये जवळपास 10 हजार मतदान कार्ड मिळाल्याने येथील निवडणूक पुढे ढकलण्यात आली. या जागेवर 28 मेला मतदान होणार आहे तर 31 मेला मतमोजणी होणार आहे.

कर्नाटक निवडणुकीत 5 वाजेपर्यंत 64 टक्के मतदान झालं आहे. सकाळी लोकांनी घराबाहेर पडून मोठ्या प्रमाणात मतदान केलं. पण दुपारनंतर मतदारांची संख्या निवडणूक केंद्रावर कमी झाली. कर्नाटकात 4.98 कोटी मतदार आहेत. कर्नाटकच्या निवडणुकीत 2600 उमेदवार मैदानात होते.