viral video : बटाट्याच्या पोत्याचा प्लाझो; किंमत ऐकून घाम फुटेल! फॅशनच्या नावावर काय पण

फॅशनच्या नावावर मार्केटमध्ये चित्र विचित्र कपडे पहायला मिळत आहेत. 

Updated: Feb 18, 2023, 08:05 PM IST
viral video : बटाट्याच्या पोत्याचा प्लाझो; किंमत ऐकून घाम फुटेल! फॅशनच्या नावावर काय पण  title=

Bori Wala Palazzo: हल्ली फॅशनच्या (Fashion) नावावर काहीही केले जाते याचे उत्तम उदाहरण म्हणजे मॉडेल उर्फी जावेद. उर्फीची फॅशन पाहून सगळेच हैरान होतात. आता एकही अशी वस्तू शिल्लक राहिली नाही की ज्या पासून उर्फीने कपडे बनवले नाहीत. गार्बेज बॅग, सायकलची चैन, शंख शिंपले अशा वेगवेगळ्या वस्तुंपासून उर्फी चित्र विचित्र कपडे तयार करते. आता अशा प्रकारचे चित्र विचित्र कपडे आता मार्केटमध्ये देखील पहायला मिळत आहेत. एका शोरुममध्ये बटाट्याच्या पोत्याचा प्लाझो (Bori Wala Palazzo) विक्रीसाठी ठेवण्यात आला. याची किंमत ऐकून घाम फुटत आहे. या प्लाझोचा व्हिडिओ प्राईज टॅगसह व्हायरल (viral video) होत आहे. 

सध्या नवीन डिझाईनचे जीन्स-टॉप फॅशनमध्ये येत आहेत. बाजारात असे काही कपडे पाहायला मिळतात. आजकाल लोक विचित्र डिझाइन्सचे कपडे घालू लागले आहेत. हे कपडे लोकांना आश्चर्यचकित करतात. प्लाझोचे नाव तुम्ही ऐकले असेलच. आजकाल प्लाझोची फॅशन खूपच ट्रेंडमध्ये आहे. खास प्रसंगी प्लाझो  स्टायलिश लुकला आणखी स्टायलिश बनवते.  वेस्टर्न वेअर सह ट्रेडिशनल लुक साठी देखील मुली प्लाझोला पसंती देतात. 

प्लाझोचे अनेक डिझाईन्स बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘बोरी वाले प्लाझो’च्या व्हिडीओने खळबळ उडवून दिली आहे. बटाटा-कांद्याची गोणी तुम्ही पाहिलीच असेल. हा प्लाझो देखील बटाट्याच्या पोत्यापासून  बनवला आहे. हा प्लाझो गोणीच वाटते. मात्र, याला प्लाझोचा शेप देण्यात आला आहे. हा प्लाझो त्याच्या किमतीमुळे देखील चर्चेत आला आहे. याच्या किमतीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.  याचा  व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. गोणी पासून बनवलेल्या या प्लाझोची किंमत 500-1000 रुपये नसून 60,000 रुपये इतकी असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

ही गोणी प्लाझो म्हणून कोण  कोण घालणार? तब्बल 60 हजार रुपये देऊन हा विचित्र पलाझो कोण विकत घेणार अशी देखील चर्चा रंगली आहे. या व्हिडिओवर सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. 
sachkadwahai या अकाऊंटवरुन या प्लाझोचा व्हिडिओ instagramवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ  19 दशलक्ष  वेळा पाहिला गेला आहे. 5 लाख 51 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे. तर, जवळपास 15 हजार लोकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.