नवी दिल्ली : कॉंग्रेसमध्ये मोठे निर्णय घेण्यासाठी एक कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज काँग्रेस कार्यकारिणीची (सीडब्ल्यूसी) स्थापना केली. ज्यात अनुभवी आणि तरुण नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. सीडब्ल्यूसीचे २३ सदस्य, १९ स्थायी निमंत्रित सदस्य आणि नऊ सदस्य असणार आहेत. राहुल गांधी यांनी २२ जुलै रोजी डब्ल्यूसीची पहिली बैठक बोलावली आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सीडब्ल्यूसीमधील अनुभवी आणि तरुण नेत्यांमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. पक्ष संघटना सचिव अशोक गेहलोत यांनी याबाबत घोषणा केली आहे. सीडब्ल्यूसी २३ सदस्य, १९ स्थायी निमंत्रित आणि नऊ आमंत्रित समावेश आहे. राहुल गांधी यांनी २२ जुलै रोजी डब्ल्यूसीची पहिली बैठक बोलावली आहे, अशी माहिती गेहलोत यांनी दिली.
सीडब्ल्यूसी सदस्य पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग, पक्षाचे कोषाध्यक्ष मोतीलाल व्होरा, अशोक गेहलोत, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, ए के अँटनी, अहमद पटेल, अंबिका सोनी आणि मंत्री यांनी ओमेन चंडी यांना संधी देण्यात आली आहे.
51 members included in the new Congress Working Committee(CWC), Janardan Dwivedi has been dropped. pic.twitter.com/kPaD4KKl87
— ANI (@ANI) July 17, 2018
तसेच माजी आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री सिद्धरमैया, माजी मुख्यमंत्री हरीश रावत, नेते, आनंद शर्मा, कुमारी शैलजा, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, कुमार वेणुगोपाल, दीपक बाबरिया, ताम्रध्वज साहू, रघुवीर मीना आणि गैखनगम यांचा समावेश आहे.
सीडब्ल्यूसीमध्ये स्थायी सदस्यांत माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम, ज्योतिरादित्य सिंधिया, बाळासाहेब थोरात, तारिक हमीद कारा, पीसी चाको, जितेंद्र सिंग, आर.पी. सिंग, पी.एल. पुनिया, रणदीप सुरजेवाला, आशा कुमारी, रजनी पाटील रामचंद्र खूंटिया, अनुग्रह नारायण सिंग, राजीव सातव, शक्तिसिंह गोहिल, गौरव गोगोई आणि ई. चेल्लकुमार यांचा सहभाग आहे.
विशेष आमंत्रित सदस्यांत केएच मुनियप्पा, अरुण यादव , दीपेंद्र हुडा , जितिन प्रसाद, कुलदीप विश्नोई, इंटकचे अध्यक्ष जी. संजीव रेड्डी, भारतीय युवक कॉंग्रेसचे आहे अध्यक्ष केशव चंद्र यादव, एनएसयूआयचे अध्यक्ष फिरोझ खान, अखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्ष सुष्मिता देव आणि काँग्रेस सेवा दल प्रमुख संयोजक लालजीभाई देसाई यांना सहभागी करण्यात आलेय.
या वर्षी मार्चमध्ये काँग्रेस महाधिवेशनात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी काँग्रेस वर्किंग कमिटीची स्थापना केली होती. या समितीचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले होते.