नवी दिल्ली : कांदा बटाटा विक्रेत्याच्या अकाऊंटमध्ये नोटबंदीच्या काळात जमा झाले ५० लाख रुपये.
या विक्रेत्याची दिवसाची कमाई २०० रुपये असून त्याच्या अकाऊंटमध्ये एवढे पैसे कुठून आली अशी चर्चा झाली. काही वेळाने त्या अकाऊंटमधून ५० लाख रुपये काढण्यात आले. या प्रकरणाची माहिती आयकर विभागाला मिळताच विक्रेत्याला नोटीस पाठवली. नोटीस बघताच विक्रेता हैराण झाला.
विक्रेत्याचा गोंधळ यासाठी झाला की, त्याच्या अकाऊंटमध्ये एवढे पैसे कसे आले हे कळण्या अगोदरच ते पैसे काढण्यात आले. तसेच हे पैसे नेमके कुणी पाठवले याची नोंद मात्र नव्हती. हा सर्व प्रकार रायपूरचा असून विक्रेता प्रसाद मिश्रा यांच्यासोबत हा प्रकार घडला.
नोटबंदीच्या काळात रायपूर जिल्ह्यातील लालपूरमधील प्रसाद मिश्रा यांच्या खात्यात ५० लाख रुपये जमा झाले. हे पैसे कोणी, का आणि कसे पाठवले याची कोणतीही माहिती त्यांना नव्हती. मात्र आयकर विभागाच्या अधिकाऱ्याने जेव्हा नोटीस पाठवली तेव्हा विक्रेत्याने सांगितले की कांदा बटाटा विकणे हा माझा साधा व्यवसाय आहे. तसेच त्याने आपल्या मालमत्तेची सर्व माहिती त्यांना दिली.
२०१३-१४ साली प्रसाद मिश्रा यांनी HDFC मध्ये अकाऊंट सुरू केलं. प्रसाद कधी कधी या अकाऊंटमध्ये पैसे भरत असतं. एक दोन वेळा त्यांनी पैसे काढले देखील आहेत. मात्र नोटबंदीच्या काळात ५० लाख कुठून आले याची माहितीच मिळाली नाही. प्रसाद यांच्यामध्ये या पैशाची माहिती त्यांना नाही. हे पैसे कुणी भरले आणि काढले याची काहीच कल्पना त्यांना नाही.