आपण मंदिरात का जातो, कधी विचार केलाय का? माहिती मिळताच लगेच वाट धराल

आपण जेव्हाही एखाद्या अडचणीत सापडतो तेव्हा तेव्हा लगेचच देवाचा धावा करायला सुरुवात करतो

Updated: May 27, 2022, 10:05 AM IST
आपण मंदिरात का जातो, कधी विचार केलाय का? माहिती मिळताच लगेच वाट धराल  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : आपण जेव्हाही एखाद्या अडचणीत सापडतो तेव्हा तेव्हा लगेचच देवाचा धावा करायला सुरुवात करतो. देवा वाचव, देवा अडचणीतून सोडव, देवा वाट दाखव देवा हे, देवा ते आणि बरंच काही. (5 reasons and Benefits of going to Temple)

देवाचा धावा करण्यापुरताच आपण थांबत नाही, तर थेट मंदिरात धाव घेतो. हीच बाब इतर धर्मियांसाठीही लागू. पण, तुम्हाला माहितीये का मंदिरात जाण्यामागेही काही फायदे आहेत. कधी या फायद्यांचा तुम्ही विचार केलाय का ? 

- मंदिरात गेल्यामुळं माणसाचे विचार सकारात्मक होतात. रोजच्या समस्यांशी दोन हात करण्यासाठी तुम्हाला बळ मिळतं. विश्वास वाढतो, आव्हानं ओलांडण्याची क्षमताही वाढते. 

- मंदिरात गेल्यामुळं जणू काही देलच आपल्याला पाहतोय या विचारानं व्यक्ती चुकीच्या कामांपासून परावृत्त होतात. परिणामी वाईट आचरणही त्यांच्यात डोकावत नाही. 

- रोज मंदिरात जाऊन देवी- देवतांची आराधना केल्यास देवाची कृपा तर राहतेच पण, दिवसही सकारात्मक जातो. 

- तुम्हाला माहिती नसेल, पण मंदिरांची उभारणी सकारात्मक ठिकाणांवर केली जाते. शिवाय या उभारणीमध्ये काही अशा गोष्टी असतात ज्यातून सकारात्मक उर्जा बाहेर पडत असते. 

- मंदिरात होणारे मंत्रोच्चार, पठण , घंटा आणि शंखनाद यामुळं नकारात्मक शक्तींचा नायनाट होण्यास मदत होते. याचा आपल्या मनावरही थेट परिणाम दिसून येतो. 

(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भावर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)