नवी दिल्ली : देशात ५ ठिकाणी आणखी सोन्याच्या खाणी सापडल्या आहेत.
एका हिंदी न्यूज वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार, झारखंडच्या रांचीमध्ये सोन्याच्या या ५ नवीन खाणी सापडल्या आहेत. कुबासाल, सोनापेट, जारगो, सेरेंगडीह आणि सरायकेला-खरसावा जिल्ह्यातील जेलगडा येथे या खाणी सापडल्या आहेत. भारतीय भूगर्भ सर्वेक्षण म्हणजेच जीएसआयने या ठिकाणी संशोधनासाठी प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला आहे.
भारतीय भूगर्भ संशोधन अर्थात जीएसआयचे भूअभ्यासकांनी प्राथमिक तपासणीत हा ५ ठिकाणी सोन्याची खाण असल्याची शक्यता वर्तवली आहे. खडकावरचे नमुने अभ्यासल्यानंतर येथे सोन्याच्या खाणी असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. यासाठी येथे जमिनीच्या आत संशोधन करण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. यासाठी अनेक कोटी रुपये खर्च येतो. यामुळे जीएसआयने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे.
कुबासाल आणि सोनापाट हे नक्षलवाद्यांना भाग मानला जातो. रडगांवपासून उजव्याकडे दीड किलोमीटरवर ही सोन्याची खाण असल्याची शक्यता आहे. भारतीय भूगर्भ अभ्यासकांकडून केंद्र सरकारला पाठविलेल्या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला तर संपूर्ण योजना यासाठी तयार केली जाईल. या अंतर्गत खडकांच्या रासायनिक तपासण्यामुळे हे ओळखण्यात येईल की कोणत्या प्रकारच्या सोने येथे उपलब्ध आहेत आणि कसे काढू शकतो. यासंपूर्ण प्रक्रियेला २ वर्ष लागू शकतात.